वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचे उत्तर देताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. पंडित नेहरू यांच्या बोटचेप्या धोरणामुळे गोव्यासारख्या प्रदेश भारताच्या स्वातंत्र्यानंतरही 15 वर्षे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत राहिला, असा आरोप मोदींनी नेहरूंचे नाव घेऊन केला. नेहरूंवर त्यांनी प्रखर टीकास्त्र सोडले होते.My grandfather countryservaent they don’t need anyone’s certificate;
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर प्रतिहल्ला चढवला आहे. राहुल गांधी म्हणाले, की माझे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे देशसेवक होते. आयुष्यभर त्यांनी देशाची सेवा केली. माझ्या पणजोबांना कोणत्याही व्यक्तीच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते (मोदी) कॉंग्रेसला घाबरतात. कारण काँग्रेस नेहमी सत्य बोलत आली आहे आणि सत्याचा त्यांच्याशी (मोदींशी) काहीही संबंध नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींचे नाव न घेता लगावला.
पंतप्रधान मोदींचे सर्व भाषण आहे काँग्रेस भोवतीच केंद्रित होते. परंतु मी कोरोना संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली नाहीत. कोरोनाचा प्रभाव देशाला आर्थिक खाईत घेऊन जाईल असा इशाराही मी दिला होता. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आजही मी चीन आणि पाकिस्तानचा धोका याविषयी वारंवार बोलत आहे त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. अन्यथा देशाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
My grandfather countryservaent they don’t need anyone’s certificate;
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे विसरलात का?; राधाकृष्ण विखे-पाटलांचा सुप्रिया सुळेंना टोला!!
- राज्यसभेत मोदींचे उफाळले पवार प्रेम!!; सुप्रियांनी मोदींवर टाकली टीकेची गेम!!
- लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य
- गोवा मुक्तीचा लढा; अमेरिकेने घातला होता नेहरूंना खोडा!!