• Download App
    गुजरातमध्ये आढळले ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण ; महाराष्ट्र, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर |Most cases of black fungus found in Gujarat; Maharashtra, Andhra Pradesh ranked second and third

    गुजरातमध्ये आढळले ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण ; महाराष्ट्र, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात म्युकोरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचा धोका वाढत आहे. कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसची रुग्णसंख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या गुजरातमध्ये असून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा नंबर त्यानंतर लागत आहे. Most cases of black fungus found in Gujarat; Maharashtra, Andhra Pradesh ranked second and third

    देशात ब्लॅक फंगसचे 8,848 रुग्ण झाले आहेत. गुजरातमध्ये 2281, महाराष्ट्रात 2000 आणि आंध्र प्रदेशात 910 रुग्ण आढळले आहेत. या सह या आजाराचे अन्य राज्यातही रुग्ण वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.



    केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी विविध राज्यातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन इंजेक्शन्ससाठी 23,680 डोस पुरविल्याची माहिती दिली.

    राज्य आणि ब्लॅक फंगसचे रुग्णसंख्या

    • केंद्रशासित प्रदेश- 442
    • गुजरात- 2281
    • महाराष्ट्र- 2000
    • आंध्र प्रदेश- 910
    • मध्य प्रदेश- 720
    • राजस्थान- 700
    • कर्नाटक- 500
    • तेलंगना- 350
    • दिल्ली- 197
    • उत्तर प्रदेश- 112
    • पंजाब- 95
    • छत्तीसगढ़- 87
    • बिहार- 56
    • तामिळनाडू- 40
    • केरळ- 36
    • झारखंड- 27
    • ओडिशा- 15
    • चंडीगढ़- 8
    • दमन दीव आणि दादरा नगर हवेली- 6
    • उत्तराखंड- 2
    • त्रिपुरा- 1
    • पश्चिम बंगाल- 1

    Most cases of black fungus found in Gujarat; Maharashtra, Andhra Pradesh ranked second and third

     

     

     

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य