प्रतिनिधी
नवी दिल्ली : एकीकडे राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने शरद पवार प्रेम उफाळून आले असले तरी पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र मोदींवर टीकेची गेम टाकली आहे…!!Modi’s love for Pawar erupts in Rajya Sabha !!; Supriya casts criticism on Modi !!
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील धन्यवाद प्रस्तावाचा चर्चेला उत्तर देताना शरद पवार यांची स्तुती केली. पक्षाच्या पलिकडे जाऊन देशही कसे बघावे हे पवारांकडून तरी शिका, असे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले.
मात्र, दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याने मनस्वी दु:ख झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही. हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही, तर हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. राज्यातील भाजप आमदार, खासदारांनी याविरोधात उभे राहिले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
लोकशाहीत टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे. तो लोकशाहीने आपल्याला दिला आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा होती की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना देशाला दिशा देणारे विचार मांडतील परंतु त्यांनी जे वक्तव्य केले त्याने राज्याचा अपमान झाला आहे. पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर ते देशाचे पंतप्रधान असतात ते कुठल्या पक्षाचे नसतात याचा विसर त्यांना पडलेला दिसतो अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.
पंतप्रधानांनी राज्यांना दिशा द्यावी. राज्ये अडचणीत आहेत. कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. चीनने नवा प्रश्न निर्माण केला आहे. नोकर्यांचा प्रश्न आहे. यावर काही बोलतील या अपेक्षेने देश बघत होता. दुर्दैव की आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले. महाराष्ट्राने भाजपचे १८ खासदार निवडून दिले. तुम्ही पंतप्रधान आहात, त्यात सिंहाचा वाटा महाराष्ट्रातील मतदारांचा आहे. त्या महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केला हे धक्कादायक असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
भाजपचे पंतप्रधान नाही, तर तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. पंतप्रधान हे पद पक्षाचे नाही ते संविधानाने दिलेले पद आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली. राजकारणाची पातळी इतकी घसरली आहे की आपण माणुसकीही विसरणार आहोत. कोण कुणामुळे कोरोना स्प्रेडर होते हे आत्मपरीक्षण करावे हे नवाब मलिक बोलले ते बरोबर होते असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Modi’s love for Pawar erupts in Rajya Sabha !!; Supriya casts criticism on Modi !!
महत्त्वाच्या बातम्या
- लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य
- गोवा मुक्तीचा लढा; अमेरिकेने घातला होता नेहरूंना खोडा!!
- स्वत : ची “शांतिदूत” प्रतिमा जपण्यासाठी नेहरूंनी गोव्याला पारतंत्र्यात ठेवले!!; मोदींचा घणाघात
- इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाला पाठिंबा दिला नाही म्हणून किशोर कुमारांच्या गाण्यांवर बंदी!!