• Download App
    काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे, मेहबूबा मुफ्ती यांचे आवाहन|Mehbooba Mufti urges youth in Kashmir to lay down arms and come forward for peaceful talks

    काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे… चक्क मेहबूबा मुफ्तींचे आवाहन!

    काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे असे आवाहन पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आपला पक्ष जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संघर्ष करत राहू, असेही त्यांनी सांगितले.Mehbooba Mufti urges youth in Kashmir to lay down arms and come forward for peaceful talks


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काश्मीरमधील युवकांनी शस्त्रे टाकून शांततापूर्ण चर्चेसाठी समोर यावे असे आवाहन पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे.

    आपला पक्ष जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा मिळविण्यासाठी संघर्ष करत राहू, असेही त्यांनी सांगितले.मेहबूबा म्हणाल्या, शस्त्रांची भाषा कोणीही समजून घेत नाही. जर युवकांनी शांततापूर्ण मार्गाने आपले म्हणणे मांडले तरच जग ऐकून घेईल.



    मात्र तुम्ही बंदुकीची भाषा बोलू लागलात तर मात्र मारले जाल. त्यामधून काहीही साध्य होणार नाही. यामुळेच माझे युवकांना आवाहन आहे की त्यांनी शस्त्राचामार्ग सोडून चर्चेसाठी तयार व्हावे. त्यांचा आवाज एक दिवस ऐकलाच जाईल.

    मेहबूबा म्हणाल्या, आमच्याकडून जे हिरावून घेतले आहे ते देशाने परत द्यावे अशी आमची मागणी आहे. तुम्हाला जम्मू आणि काश्मीरमधील लोकांची काळजी असेल, त्यांनी आपल्यासोबत यावे अशी इच्छा असेल तर जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा पुन्हा सन्मानाने परत करावा.

    त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. माझे देशाला आवाहन आहे. परंतु, मी हे आवाहन केले की भारतीय जनता पक्षाला राग येतो. मी ही मागणी पाकिस्तानला करतेय का? कारण भारतीय राज्यघटनेने आम्हाला हा विशेष अधिकार बहाल केलेला आहे.

    Mehbooba Mufti urges youth in Kashmir to lay down arms and come forward for peaceful talks

    वाचा…

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार