• Download App
    कोरानाविरुध्दच्या लढाईत आपण अजूनही गोंधळलेलोच पण लवकरच नियंत्रण मिळवू, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा विश्वास|We are still confused in the fight against corana but we will get it under control soon, believes the Director General of the World Health Organization

    कोरानाविरुध्दच्या लढाईत आपण अजूनही गोंधळलेलोच पण लवकरच नियंत्रण मिळवू, जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा विश्वास

    कोरोनाविरुध्दच्या लढाईत अजूनही गोंधळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या महामारीचा आणखी काही काळ सामना करावा लागणार आहे. मात्र, चांगल्या आरोग्य सुविधांच्या जोरावर येत्या काही महिन्यांत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकू असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी व्यक्त केला आहे.We are still confused in the fight against corana but we will get it under control soon, believes the Director General of the World Health Organization


    विशेष प्रतिनिधी

    जिनेव्हा: कोरोनाविरुध्दच्या लढाईत अजूनही गोंधळल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या महामारीचा आणखी काही काळ सामना करावा लागणार आहे. मात्र, चांगल्या आरोग्य सुविधांच्या जोरावर येत्या काही महिन्यांत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकू असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस एडहॉलम यांनी व्यक्त केला आहे.

    टेड्रोस एडहॉलम म्हणाले, समाजाचे चलनवलन सुरू व्हावे, अर्थव्यवस्था पुन्हा एकदा बहरावी, व्यापार सुरू व्हावा, लोक प्रवास करू शकावेत अशी आमचीही इच्छा आहे. मात्र, सध्या तरी परिस्थिती भीेण आहे.



    अनेक देशांतील आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण आला आहे. अतिदक्षता विभाग (आयसीयू) भरून वाहत आहेत. लोक उपचाराअभावी तडफडून मरत आहेत. मात्र, हे टाळता येण्यासारखे आहे.
    ते म्हणाले,

    कोविड महामारीशी आपल्याला आणखी खूप काळ सामना करायचा आहे. परंतु, आशेचे किरणही दिसत आहेत. यंदाच्या वर्षी पहिल्या दोन महिन्यांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली होती. याचा अर्थ हा व्हायरस आणि त्याचा व्हेरिएंट यांना रोखणे शक्य आहे.

    टेड्रोस एडहॉलम गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाविरुध्द जगाला इशारे देत आहेत. काही देशांमध्ये निष्काळजीपणामुळे कोरोनाची भयानक परिस्थितीत निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये म्हटले होते.

    तसेच संपूर्ण जगाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जास्त सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना संकटामुळे संपूर्ण जग, विशेषत: उत्तर गोलार्ध गंभीर टप्प्यावर येऊन ठेपला आहे. अनेक देशात कोरोना प्रचंड फोफावत आहे.

    We are still confused in the fight against corona but we will get it under control soon, believes the Director General of the World Health Organization

     

    Related posts

    सिंगापूर-हाँगकाँगनंतर आता अमेरिकेत MDH आणि एव्हरेस्टची मसाल्यांची तपासणी; यूएस फूड रेग्युलेटर करतेय पडताळणी

    पाकिस्तानने म्हटले- भारतीय नेत्यांनी निवडणुकीत आमचा वापर करू नये; राजकारणासाठी मुद्दा करत आहेत

    US पोलिसांनी कृष्णवर्णीयाचा गळा दाबला, रुग्णालयात मृत्यू; श्वास गुदमरल्याचे सांगत होता, पोलिसांनी पाय काढलाच नाही