वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपचा अभूतपूर्व विजय झाल्यानंतर त्याचे खापर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींवर फोडणाऱ्या राहुल गांधींना खुद्द मायावती यांनी जोरदार टोला हाणला आहे. काँग्रेसने स्वतःची काळजी करावी. इतर पक्षांची काळजी करत बसू नये. बहुजन समाज पक्ष म्हणजे पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा पक्ष नव्हे, अशा खोचक शब्दात मायावती यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. Mayawati slammed Rahul Gandhi
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष या दोघांचाही दारुण पराभव झाला. त्याविषयी तब्बल दोन महिन्यांनंतर भाष्य करताना राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाचे खापर मायावतींवर फोडले. काँग्रेसची बहुजन समाज पक्षाशी युती करण्याची इच्छा होती. मायावती मुख्यमंत्री झाल्या असत्या तरी मला चालले असते. परंतु मायावतींनी आमची ऑफर धुडकावली आणि भाजपला मोकळे रान करून दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी कालच केला होता.
राहुल गांधी यांच्या आरोपाला मायावती यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपला संपूर्ण देश काँग्रेसमुक्तच नव्हे तर विरोधीपक्ष मुक्त करायचा आहे. ग्रामपंचायतीपासून देशपातळीपर्यंत यांना एकाच पक्षाची सत्ता आणायची आहे. त्या भाजपच्या विरोधात आम्ही प्रामाणिकपणे लढतो आहोत. आम्ही म्हणजे पंतप्रधानांना बळजबरीने मिठी मारणारा पक्ष नव्हे, असा टोला मायावतींनी राहुल गांधी यांना लगावला.
राहुल गांधी यांनी माझ्या मनात द्वेष नाही, असे म्हणत लोकसभेत कामकाज सुरू असताना मधेच आपल्या आसनावरून उठून पंतप्रधान मोदींच्या आसनाजवळ जात त्यांना बळजबरीने मिठी मारली होती. त्यावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली होती. हाच संदर्भ घेऊन मायावती यांनी राहुल गांधींना तडाखा हाणला आहे.
Mayawati slammed Rahul Gandhi
महत्त्वाच्या बातम्या
- अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे संपूर्ण कुटुंबच आहे सेलीब्रिटी, दहा वर्षांच्या मुलीने १७ जणांचे प्राण वाचविल्याने मिळाला होता राष्ट्रीय शौर्य पुरस्कार
- इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड, अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाआधीच सोडले राजकीय मैदान
- मोफतचे आश्वासन देऊन भुळविनाऱ्या पक्षांना जनतेनेच शिकवावा धडा, निवडणूक आयोगाची न्यायालयात भूमिका
- वेश्यांचे पैसेही खाता, हे सरकार आहे की सर्कस, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल