• Download App
    पश्चिम बंगालमधील विखार कमी होईना, ममतादिदींची पंतप्रधान मोदींवर पुन्हा टीका Mamata lashes on PM modi

    पश्चिम बंगालमधील विखार कमी होईना, ममतादिदींची पंतप्रधान मोदींवर पुन्हा टीका

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता – प. बंगाल विधानसभा निवडणुकीतूल प्रचारात निर्माण झालेला विखार अजूनही कायम आहे. प्रधानमंत्री किसान योजनेवरून प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर पुन्हा टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता शुक्रवारी मिळाला असतानाच त्यांनी लाभार्थ्यांना रक्कम हस्तांतरित करण्यात केंद्र चालढकल करीत असल्याचा आरोप केला. Mamata lashes on PM modi

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत नोंदणी केलेल्या ४१ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे सात लाख ५५ हजार रक्कम मिळण्यास पात्र ठरले.



    ममता यांनी शेतकऱ्यांनाच खुले पत्र लिहिले. आपल्या सरकारने अथक लढा दिल्यानेच पात्र शेतकऱ्यांना लाभ झाल्याचा दावा त्यांनी केला. ही रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करावी असे आवाहन ममता यांनी सहा मे रोजी ममता केंद्रीय कृषी मंत्रालयाला केले होते. त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये मिळणार होते,

    पण फारच थोडी रक्कम मिळाली आहे. आम्ही जोर लावला नसता तर ती सुद्धा पदरात पडली नसती. संपूर्ण मोबदला मिळावा म्हणून आम्ही लढा चालूच ठेवू. प्रधानमंत्री किसान योजना म्हणजे बंगालच्या योजनेची कॉपी असल्याचा दावाही ममता यांनी केला.

    Mamata lashes on PM modi

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!