वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लवकरात लवकर पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय उतावीळ झाल्या आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती देऊन निवडणूक आयोगाला पोटनिवडणूक देण्याची आग्रही मागणी केली आहे. Mamata in a hurry for by-elections in West Bengal; A delegation of Trinamool MPs at the door of the Election Commission
आता त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे धाडले आहे. हे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला राज्यातल्या परिस्थितीचे आणि पोटनिवडणुका लवकर घेण्याची मागणी करणारे पत्रक सादर करणार आहे. निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेल्या निर्णयानुसार देशभरातील कोरोना आटोक्यात आल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेणार नाही, हा निर्णय कायम ठेवला तर ममता बॅनर्जी यांना विधानसभेत निवडून येणे आणि मुख्यमंत्रीपद टिकवणे फार अवघड होणार आहे. त्यामुळे त्यांनी पोटनिवडणूक घेण्याची घाई चालवली आहे.
यासाठी त्यांनी आपल्याच भूमिकेला मुरड देखील घातली आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी त्या एकीकडे केंद्र सरकारला वारंवार पत्र लिहून जादा लसींची मागणी करत आहेत आणि आता पोटनिवडणुकीसाठी उतावीळ झाल्याने निवडणूक आयोगाला त्या राज्य कोरोनाची लाट आटोक्यात आल्याची खात्रीही देत आहेत.
याच स्वरूपाचे पत्र घेऊन तृणमूळ काँग्रेसचे 5 खासदार सुगता राय, महुवा मोईत्रा, सुखेंदू रे, जवाहर सरकार आणि साजिदा अहमद हे निवडणूक आयोगाला भेटले आहेत. राज्यात लवकरात लवकर पोटनिवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य केली नाही तर ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्याचा शिवाय पर्याय राहणार नाही. कारण पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे त्यांना विधान परिषदेद्वारे विधिमंडळात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच मार्ग अवलंबून त्यांना पंतप्रधान मोदींच्या दारात जाणे भाग पडू शकते.
Mamata in a hurry for by-elections in West Bengal; A delegation of Trinamool MPs at the door of the Election Commission
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया