विशेष प्रतिनिधी
पणजी : पश्चिम बंगालमध्ये प्रथमच नशीब अजमावत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेस याला गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. पेसने गुरूवारपासून जनसंपर्क मोहिमेला सुरूवात केली आहे. याठिकाणी ममता बॅनर्जी यांनी जातीय गणितही समोर ठेवले आहे.Mamata Banerjee names former tennis star Leander Paes to be Trinamool Congress chief in Goa Assembly polls
पुढील वर्षी गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी गोव्यात प्रचंड तयारीसह निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले आहे. मोठ्या प्रमाणात होर्डींग्ज लावण्यात आली आहेत. तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर टेनिसपटू लिएंडरने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तृणमूलने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात प्रादेशिक पक्षांसोबत निवडणूकीत युती करणार असल्याचे ममता यांनी गोवा दौऱ्यात स्पष्ट केले होते. लिएंडर पेस गोव्यात तृणमूलचा मुख्य चेहरा असेल, असे मानले जात आहे. पुढील वर्षी गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
गुरुवारी लिएंडर पेसने ट्विट केले की माझ्या मोहिमेची सुरुवात स्वातंत्र्यसेनानी ज्युलियाओ मिनेझिस यांच्या एम्बेलिम येथील घरी आदरांजली देऊन, कोळीवाड्डो डॉकयार्ड येथील मच्छिमारांशी संवाद साधून झाला.
तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतर, पेस म्हणाला होता की, माझे ममता बॅनजीर्सोबतचे नाते अनेक वर्षे जुने आहे. ममता दीदी जे बोलतात तेच करतात. त्या खऱ्या चॅम्पीयन आहेत. गोव्यातील जनतेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी तुमच्या बहिणीसारखी आहे,
मी येथे सत्ता बळकावण्यासाठी आलेली नाही. संकटाच्या वेळी लोकांना मदत केली तर माझ्या मनाला शांती मिळते. आम्ही तुम्हाला त्यात मदत करू. मला भविष्यात गोव्याला एक मजबूत राज्य बनवायचे आहे. मला गोव्यात नवी पहाट पहायची आहे.
Mamata Banerjee names former tennis star Leander Paes to be Trinamool Congress chief in Goa Assembly polls
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!