• Download App
    आज लोकसभा निवडणूक झाली तर??; सर्वेक्षणात काँग्रेसला ट्रिपल डिजिट जागा ही खरी बातमी!! Loksabha Elections Survey : Congress gets triple digit means big blow to regional parties

    आज लोकसभा निवडणूक झाली तर??; सर्वेक्षणात काँग्रेसला ट्रिपल डिजिट जागा ही खरी बातमी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आज लोकसभा निवडणूक झाली तर असे जे सर्वेक्षण टाइम्स नाऊ भारत आणि ईटीजी रिसर्चच्या संशोधकांनी बाहेर आणले आहे. त्यामध्ये केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकीत केले आहे. पण मूळात ही बातमीच नाही. कारण अशी अनेक सर्वेक्षणे आहेत, ज्यात मोदींच्या परत सत्तेवर येण्याचे भाकीत वर्तविले आहे. टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्वेक्षणात काँग्रेसला लोकसभेच्या 106 ते 144 जागा मिळण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. याचा अर्थ काँग्रेस ट्रिपल डिजिट गाठणार आहे आणि ही खरी बातमी आहे. Loksabha Elections Survey : Congress gets triple digit means big blow to regional parties

    काँग्रेसने ट्रिपल डिजिट आकडा गाठणे आणि तरीही भाजप 292 ते 338 जागा मिळवून सत्तेवर येणे याचा नेमका अर्थ काय होतो??, याचा विचार केला, तर तथाकथित महागठबंधन, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी, विरोधकांचे ऐक्य वगैरे राजकीय हालचालींचे भवितव्य काय असेल??, हेच नेमके यातून दिसून येते. भाजपला 292 ते 338 जागा मिळतील, याचा अर्थ भाजपच्या सध्याच्या यशात अजिबातच फरक पडणार नाही. उलट ते थोडे घटेल किंवा जास्त वाढेल. पण या पलीकडे भाजपच्या दृष्टीने या सर्वेक्षणात चिंतेचा विषय नाही.



    काँग्रेससाठी मात्र अशा पल्लवीत करणारे हे सर्वेक्षण असून 2014 2019 मध्ये जी काँग्रेस अनुक्रमे 44 आणि आता 54 अशा डबल डिजिटमध्येच खासदार निवडून आणू शकली आहे, ती काँग्रेस 106 ते 144 या रेंजमध्ये जाणार असेल ती काँग्रेससाठी ती फार मोठी पॉलिटिकल अचीव्हमेंट असेल आणि बाकीच्या सर्व प्रादेशिक पक्षांसाठी ती सर्वाधिक निराशा असेल. कारण जेवढी काँग्रेस वाढेल, तेवढा भाजप घटत नाही तर प्रादेशिक पक्ष घटतात, असे हे सर्वेक्षण सूचित करते. याचा अर्थ प्रादेशिक महत्त्वाकांक्षा उफाळलेल्या नेत्यांना काँग्रेसचे संभाव्य यश मोठी चपराक असणार आहे आणि या सर्वेक्षणातल्या आकड्याची ही खरी बातमी आहे!!

    कारण काँग्रेसचे मोठे अपयश हेच तर प्रादेशिक पक्षांच्या यशाचे खरे राजकीय भांडवल होते. त्या राजकीय भांडवलाच्या बळावर तर प्रादेशिक नेते काँग्रेसला आपल्या विरोधी ऐक्यातून वगळून स्वतः पुढे येत होते. पण आता काँग्रेस ट्रिपल डिजिटमध्ये जाणार असेल तर प्रादेशिक पक्षांच्या राजकीय भांडवलालाच गळती लागेल, असेच आकडेवारी सांगते. त्यामुळे लोकसभा निवडणूक वर्षभरानंतर आहे. पण त्याच्या आधीच प्रादेशिक पक्षांच्या महत्त्वाकांक्षांना लगाम घालणारी ही बातमी आहे.

    बाकी महत्त्वाचे मुद्दे काय राम मंदिर 370 महागाई हे नेहमीचेच प्रश्न सर्वेक्षणात आहेत. आणि त्याची नेहमीची उत्तरे लोकांनी दिली आहेत. पण काँग्रेसच्या आर्थिक ट्रिपल डिजिटमध्ये जाईल याचा अर्थ काँग्रेसला राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा लाभ निश्चित झाला आहे असे मान्य करावे लागेल आणि काँग्रेसला ट्रिपल डिजिट जागा मिळणे हा संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला ट्रिपल फार मोठा बूस्टर डोस असेल. जी खऱ्या अर्थाने केंद्रीय पातळीवर विरोधकांचा एक मोठी ताकद उभी करेल हे या सर्वेक्षणाचे खरे वैशिष्ट्य आणि यातली खरी बातमी आहे!!

    Loksabha Elections Survey : Congress gets triple digit means big blow to regional parties

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य