• Download App
    खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी|Leading edible oil brands have slashed prices by 10 to 15 per cent

    खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी कमी केल्या आहेत. कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) कमी करण्यात आली आहे.Leading edible oil brands have slashed prices by 10 to 15 per cent

    द सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियने ही माहिती दिली आहे. असोसिएनच्या सर्व सदस्यांनी खाद्यतेलाच्या किंमती कमी केल्याचे म्हटले आहे.असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुवेर्दी म्हणाले की, असोसिएशनने वास्तविक एमआरपीसह खाद्यतेलाची विक्री करण्याच्या सूचना दिल्या होत्या.



    त्याला सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अदानी विल्मर (फॉर्च्युन ब्रँड्स) रुची सोया (महाकोश, सनरिच, रुची गोल्ड, न्यूट्रेला ब्रँड्स), इमामी (हेल्दी आणि टेस्टी ब्रँड्स), बंज (डालडा/गगन/चंबल ब्रँड्स), जेमिनी (फ्रीडम सनफ्लॉवर आॅइल ब्रँड्स) यासह प्रमुख सदस्यांनी किंमती कमी केल्या आहेत.

    अतुल चतुवेर्दी यांनी सांगितले की, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी नुकतीच असोसिएशनसोबत खाद्य तेलाच्या किमतींचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

    त्यांनी सांगितले होते की ग्राहकांसाठी लिहिण्यात आलेली एमआरपी आयात शुल्कातील कपातीशी सुसंगत नाहीत. उत्पादक कंपन्यांची किंमत प्रत्यक्षात कमी असली तरी ग्राहकांना एमआरपी देण्याची सक्ती केली.खाद्य तेलाच्या किंमतीवर दिलेल्या सवलतीसाठी कंपन्यांनी जाहिरात द्यावी, असे आवाहनही चतुर्वेदी यांनी केली आहे.

    Leading edible oil brands have slashed prices by 10 to 15 per cent

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट