आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली चित्रपट अभिनेत्री पद्मश्री कंगना रनोट हिच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी रुपनगर-किरतपूर साहिब रस्त्यावर अडवले. कंगनाच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. शेतकरी आणि पंजाबींवर केलेल्या वक्तव्याबद्दल कंगना माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोठा पोलीस फौजफाटाही घटनास्थळी पोहोचला, मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तो अपुरा ठरला. नंतर संधी साधून कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागितली. यानंतर शेतकऱ्यांनी ताफ्याला जाऊ दिले.Kangana Ranaut CStopped By Protesters In Rupnagar Of Punjab
प्रतिनिधी
चंदिगड : आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली चित्रपट अभिनेत्री पद्मश्री कंगना रनोट हिच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी रुपनगर-किरतपूर साहिब रस्त्यावर अडवले. कंगनाच्या वाहनांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.
शेतकरी आणि पंजाबींवर केलेल्या वक्तव्याबद्दल कंगना माफी मागत नाही तोपर्यंत त्यांना जाऊ देणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. मोठा पोलीस फौजफाटाही घटनास्थळी पोहोचला, मात्र शेतकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे तो अपुरा ठरला. नंतर संधी साधून कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागितली. यानंतर शेतकऱ्यांनी ताफ्याला जाऊ दिले.
यापूर्वी पोलिसांची समजूत घातल्यानंतरही शेतकरी विशेषत: महिला तेथून निघण्यास तयार नव्हत्या. त्या माफी मागण्यासाठी आग्रही होत्या. कंगनाने आमच्या महिलांची माफी मागावी, असे शेतकरी म्हणत होते. त्यानंतर येथून त्यांना जाण्याची परवानगी दिली जाईल. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे चंदगड-उना महामार्गावर बराच वेळ चक्का जाम झाला होता.
माफी मागून कंगना निघू लागली तेव्हा तिने गाडीतून खाली उतरून लोकांना अभिवादन केले. यावेळी कंगनासोबत फोटो काढण्यासाठी शेतकरी उत्सुक दिसले. सगळे सेल्फी काढू लागले.
दरम्यान, कंगना नेहमीच शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडली आहे. याप्रकरणी कंगनाच्या विरोधात अनेक तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलनाच्या सुरुवातीला कंगनाने ट्विटरवर एका पंजाबी वृद्ध महिलेचा फोटो शेअर केला आणि लिहिले की,
असे लोक 50-50 रुपये घेऊन आंदोलनापर्यंत पोहोचतात. यानंतर कंगना शेतकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. कंगनाच्या या वक्तव्यामुळे ती महिलाही संतापली आणि तिने कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली. वादग्रस्त विधाने आणि कमेंट्समुळे कंगनाचे ट्विटर अकाउंटही सस्पेंड करण्यात आले होते.
Kangana Ranaut Convoy Stopped By Protesters In Rupnagar Of Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : सावरकरांवर टीका, सत्ताधाऱ्यांचे तोंडावर बोट देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकार निशाणा
- आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी राहुल गांधी आक्रमक!!; सादर केली पंजाबची 403 शेतकऱ्यांची यादी
- NCB च्या प्रमुखांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलं पत्र ; राज्यातली महत्त्वाची पाच ड्रग्ज प्रकरणं एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शाह यांचे आदेश
- तयारी बूस्टरची : 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कोविड लसीचा बूस्टर डोस द्यावा, तज्ज्ञ शास्त्रज्ञांची शिफारस