• Download App
    Kamal Nath claims, Rahul Gandhi will be the prime ministerial candidate of all opposition in 2024 loksabha elections

    कमलनाथांच्या तोंडून भारत जोडो यात्रेचे खरे कारण बाहेर; राहुल गांधी 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार!!

    वृत्तसंस्था / प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारत जोडो वगैरे ठीक आहे, पण राहुल गांधी यांनी आपले नेतृत्व काँग्रेसमध्ये आणि सर्व विरोधी पक्षांमध्ये प्रस्थापित करण्यासाठीच भारत जोडो यात्रा काढल्याच्या अटकळी राजकीय निरीक्षकांनी बांधल्या होत्या. काही पक्षांच्या नेत्यांचे तेच म्हणणे होते. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे किंबहुना हे राजकीय सत्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या तोंडून बाहेर आले आहे. Kamal Nath claims, Rahul Gandhi will be the prime ministerial candidate of all opposition in 2024 loksabha elections

    राहुल गांधी भारत जोडो यात्रेत जे कष्ट घेत आहेत, ते पाहून हे निश्चित वाटते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ते केवळ विरोधी पक्षांचा चेहरा असतील असे नाही, तर ते सर्व विरोधकांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे वक्तव्य कमलनाथ यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाची कमलनाथ यांनी स्तुती केली आहे. गांधी परिवार हा एकमेव परिवार आहे, ज्याने या देशासाठी खूप मोठे बलिदान केले आहे.


    Bharat Jodo Yatra : आजपासून सुरू होणार काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’, पक्षाने किती तयारी केली, वाचा सविस्तर…


    त्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व राहुल गांधी करतात. जगाच्या इतिहासात सर्वात मोठी ठरेल, अशी पदयात्रा राहुल गांधींनी काढली आहे. 3 हजार किलोमीटर पेक्षा जास्त ही पदयात्रा असेल. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा संपूर्ण देशात उजळली आहे. तिचा लाभ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबर सगळ्या विरोधकांना होईलच. राहुल गांधी हे फक्त सगळ्या विरोधकांचा एक चेहरा असतील असे नव्हे, तर ते पंतप्रधान पदाचे उमेदवार देखील असतील, असे कमलनाथ यांनी स्पष्ट केले आहे.

    राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही कोणत्याही सामाजिक उद्दिष्टांसाठी नसून काँग्रेसमध्ये स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी असल्याची टीका भाजपच्या नेत्यांनी सुरुवातीलाच केली होती. या टीकेला वायएसआर काँग्रेस, तेलंगण राष्ट्र समिती, तृणमूल काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांनी दुजोराही दिला होता.

    कमलनाथ यांच्या तोंडून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतले हे राजकीय सत्यच बाहेर आले आहे. कारण त्यांनी राहुल गांधींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांचे मिळून पंतप्रधान पदाचे उमेदवार ठरविले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस समर्थक आणि काँग्रेस विरोधक पक्षांच्या नेत्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Kamal Nath claims, Rahul Gandhi will be the prime ministerial candidate of all opposition in 2024 loksabha elections

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!