• Download App
    पंतप्रधानांवरील द्वेषातून कॉँग्रेसकडून देशाचा अपमान, भारत विश्वभिकारी झाल्याचा केला आरोप|Insted of Vishvguru India beame Vishvbhikari, congress accused

    पंतप्रधानांवरील द्वेषातून कॉँग्रेसकडून देशाचा अपमान, भारत विश्वभिकारी झाल्याचा केला आरोप

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषातून कॉँग्रेसने देशाचाच अपमान केल असून भारत विश्वगुरू नव्हे तर विश्वभिकारी बनला असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात गैरव्यवस्थापन झाल्याची टीका कॉँग्रेसने केली आहे.Insted of Vishvguru India beame Vishvbhikari, congress accused


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील द्वेषातून कॉँग्रेसने देशाचाच अपमान केल असून भारत विश्वगुरू नव्हे तर विश्वभिकारी बनला असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात गैरव्यवस्थापन झाल्याची टीका कॉँग्रेसने केली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविणार असल्याचे म्हटले आहे. याचा संदर्भ देऊन कॉँग्रेसने म्हटले आहे की मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन करणार असल्याचे आश्वासन दिले होते. भारत विश्वगुरू होणार असल्याचे म्हटले होते. पण भाजपाने भाराला विश्वभिकारी बनविले आहे.



    पत्रकारांशी बोलताना पंजाब कॉँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला पाच ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था करून विश्वगुरू करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, मला वाटते भारत हा विश्वभिकारी बनला आहे. आपण सगळ्यांकडून मदत घेत आहोत

    . दररोज ऑक्सिजन घेऊन विमाने येत आहेत. यातूनच सरकारचे ऑक्सिजनबाबतचे गैरव्यवस्थापन स्पष्ट होत आहे.दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने गरजेपेक्षा चार पट अधिक ऑक्सिजनची मागणी केल्याचा आरोप भाजपाने केला होता. या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून हा आरोप करण्यात आला आहे.

    Insted of Vishvguru India beame Vishvbhikari, congress accused

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य