• Download App
    आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल|India recived oxygen from gulf countries

    आखाती देशांतून तब्बल ५४ टन प्राणवायू घेवून `तलवार युद्धनौका` भारतात दाखल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई  : ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहिमेअंतर्गत आखाती देशातून ५४ टन ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस तलवार ही पहिली युद्धनौका मंगलोर बंदरात दाखल झाली.India recived oxygen from gulf countries

    भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहेकोरोना रुग्णांच्या साह्यासाठी मित्रदेशांमधून द्रवरूप ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणण्यासाठी `ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहीम सुरू करण्यात आळी आहे.



    त्यात सध्या नौदलाच्या नऊ युद्धनौका कुवेतपासून सिंगापूरपर्यंत तैनात असून तेथून त्या ऑक्सिजन व अन्य मदतसामुग्री घेऊन भारतात येणार आहेत.
    आज आयएनएस तलवार ही युद्धनौका बहरीनवरून

    ऑक्सिजन घेऊन मंगलोरमध्ये आली. एरावत युद्धनौका लवकरच सिंगापूरहून, तर कोलकाटा ही युद्धनौका कुवेतवरून येणार आहे. कुवेत आणि दोहा येथून तीन युद्धनौका लवकरच भारतात येणार आहेत. जलाश्व ही युद्धनौका आग्नेय आशियात असून गरज भासल्यास तीही या कामगिरीवर पाठवली जाणार असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.

    India recived oxygen from gulf countries

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममतांनी घराबाहेर 3 लोकांना थप्पड मारली; टीएमसीच्या मिरवणुकीत अंडी फेकल्यावर संतापल्या

    ममता बॅनर्जींच्या पक्षाचा पडला तिसरा तुकडा; राज्यसभेच्या तीन खासदारांनी केला भाजपमध्ये घरोबा!!

    Rahul Gandhi : राहुल गांधी म्हणाले- UGC-NET पेपर ₹2.25 लाखांना विकला गेला; ज्या वकिलाच्या दाव्याच्या आधारे सांगितले, तो जीवाला धोका सांगून भूमिगत