वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तणाव आणिआर्थिक संबंधांमध्ये अविश्वासाचे प्रचंड मळभ दाटलेले असताना भारत आणि जपान या दोन देशांमध्ये मोठ्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या भारत दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जपानच्या सहकार्याने भारतात सुरू होणाऱ्या अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचा आवर्जून उल्लेख केला आहे. India – Japan – Kishida – Modi Japan announces Rs 3.2 lakh crore investment in India
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे भारताच्या दौऱ्यावर आहेत. 14 व्या भारत-जपान शिखर परिषदेत सहभागी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर भारतात जपान तब्बल 3.2 लाख कोटी रूपये गुंतवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत-जपान भागीदारी
दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चाही झाली. याशिवाय युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे की, भारत-जपान भागीदारी पुढे नेण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल, शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी!, असे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसात जगात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, त्यानंतर या घोषणेने जपान आणि भारताचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत.
भारत-जपान घनिष्ठ भागीदारी
आज अनेक गोष्टींमुळे संपूर्ण जग हादरले आहे, भारत आणि जपान यांच्यात घनिष्ठ भागीदारी असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमचे विचार व्यक्त केले, युक्रेनमध्ये रशियाच्या गंभीर आक्रमणाबद्दल बोललो. आम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे शांततापूर्ण तोडगा हवा, असे मत जपानच्या पंतप्रधानांनी बैठकीनंतर व्यक्त केले आहे.
मोठ्या गुंतवणुकीची घोषणा
या बैठकीदरम्यान पंतप्रधान किशिदा यांनी पुढील काही वर्षांत भारतात 3.2 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली . 2014 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनीही पुढील 5 वर्षांसाठी भारतात 3.5 ट्रिलियन युआनची गुंतवणूक केली होती.
किशिदा यांचा पहिला दौरा
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध राष्ट्र प्रमुखांचे आंतरराष्ट्रीय दौरे थांबले आहेत. परंतु, आता काही ठिकाणी जगात कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर जागतिक अर्थचक्राला चालना देण्यासाठी विविध देशांचे राष्ट्रप्रमुख आंतरराष्ट्रीय दौरे आखत आहेत. त्यातलाच जपानच्या पंतप्रधानांचा भारत दौरा महत्त्वाचा आहे. जपानचे पंतप्रधान झाल्यानंतर फुमियो किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदींसमवेत शिखर बैठकीत दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलुंचा आढावा घेण्याची संधी दोन्ही देशांना मिळते आहे.
– 2018 नंतरची शिखर परिषद
2018 मध्ये टोकियो येथे दोन्ही देशांमधील शेवटची शिखर परिषद झाली होती. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्येही कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही शिखर परिषद होऊ शकली नाही. डिसेंबर 2019 मध्ये, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे तत्कालीन जपानी समकक्ष शिंजो आबे यांच्यात गुवाहाटी येथे प्रस्तावित वार्षिक शिखर परिषद नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर झालेल्या व्यापक निषेधाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती.
India – Japan – Kishida – Modi Japan announces Rs 3.2 lakh crore investment in India
महत्त्वाच्या बातम्या
- कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार
- युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती
- अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच
- कोरोनाबाबत सावधान ; मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण; दक्षता घेण्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना