• Download App
    भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक । India is a strong nation; Prime Minister of Pakistan Imran Khan again praised India

    भारत एक प्रबळ राष्ट्र ; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून भारताचे पुन्हा कौतुक

    वृत्तसंस्था

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पुन्हा कौतुक केले आहे. भारत एक प्रबळ राष्ट्र असून त्याचे कोणीही वाकडे करू शकत नसल्याचे म्हंटले आहे. अशा प्रकारचे वक्तव्य या पूर्वी दोनदा त्यांनी केले होते. India is a strong nation; Prime Minister of Pakistan Imran Khan again praised India

    इम्रान खान यांनी नॅशनल असेंब्लीतील अविश्वास प्रस्तावाआधी शुक्रवारी रात्री देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी लोकशाहीचा राग आळवला. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. लष्कर लोकशाहीचे रक्षण करणार नाही. लोकांनीच पुढे आले पाहिजे. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव हा एक विदेशी शक्तींचा कटकारस्थानचा भाग आहे.



    इम्रान खान म्हणाले, भारताने कोणत्याही महाशक्तीच्या दबावाला बळी पडून कोणतेही निर्णय घेतले नाहीत. तटस्थ भूमिका घेऊन खुबीने रशियाकडून तेल आयात केले आहे. भारत एक प्रबळ राष्ट्र असून स्वतःचे निर्णय तो इतर देशांकडून स्वतःला अनुकूल असे बनवून घेत आहे.

    विदेशी कट : आयोग नेमला

    इम्रान यांनी सरकार पाडण्यासाठी विदेशी कटाच्या पत्राची सत्यता पडताळण्यासाठी आयोग स्थापन केला आहे. निवृत्त ले.जनरल तारिक खान यांच्या अध्यक्षतेखालील आयोग पत्राची चौकशी करून ९० दिवसांत अहवाल देईल. इम्रान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी म्हणाले, ८ बंडखोर खासदार विदेशींच्या संपर्कात होते.

    India is a strong nation; Prime Minister of Pakistan Imran Khan again praised India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले