• Download App
    पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींची पहिल्या फेरीत ३६८० मतांनी आघाडी । In Bhawanipur in West Bengal by-election Mamata Banerjee leads in the first round with 3680 votes

    पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींची पहिल्या फेरीत ३६८० मतांनी आघाडी

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगाल येथील भवानीपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. पहिल्या राऊंडमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याविरोधात ३६८० मतांनी आघाडी घेतली आहे. प्रियंका टिबरेवाल याना आतापर्यत ८८१ मते पडली आहेत. In Bhawanipur in West Bengal by-election Mamata Banerjee leads in the first round with 3680 votes



    सार्वत्रिक निवडणुकीत नंदीग्राम विधानसभा मतदार संघात त्यांचा शुभेन्दू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यानंतर त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. पण, आमदार बनण्यासाठी त्यांना पोटनिवडणूक लढवावी लागली आहे. आज भवानीपुर मतदारसंघात मतमोजणी सुरु असून मतदानाच्या पहिल्या फेरीत त्यांनी आघाडी घेतली आहे. ही निवडणूक ममतांसाठी महत्वाची आहे कारण त्या जिंकल्या तर मुख्यमंत्री बनणार आहेत. अर्थात भवानीपुर हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो. त्या याच मतदार संघातून निवडून आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी भवानीपूर मतदार संघ सोडून नंदीग्राम मध्ये निवडणूक लढवली होती. परंतु त्या पराभूत झाल्या होत्या.

    In Bhawanipur in West Bengal by-election Mamata Banerjee leads in the first round with 3680 votes

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य