• Download App
    'नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर…, NSA अजित डोवाल यांचं मोठं विधान! If Netaji Subhash Chandra Bose was alive India would not have been partitioned  NSA   Ajit Dovals big statement

    ‘नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर…, NSA अजित डोवाल यांचं मोठं विधान!

    जिना यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल काय म्हटलं होत, हेही डोवाल यांनी सांगितलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी (17 जून) दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मारक येथे पहिले भाषण दिले. यादरम्यान त्यांनी देशाची फाळणी आणि नेताजींच्या व्यक्तिमत्त्वावर भरभरून भाष्य केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हयात असते तर भारताची फाळणी झालीच नसती, असे त्यांनी म्हटले आहे. If Netaji Subhash Chandra Bose was alive India would not have been partitioned  NSA   Ajit Dovals big statement

    ते म्हणाले, “नेताजींनी आयुष्यात अनेकदा धैर्य दाखवले आणि महात्मा गांधींना आव्हान देण्याचे धाडसही त्यांच्यात होते.” डोवाल म्हणाले, “पण तेव्हा महात्मा गांधी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या शिखरावर होते. त्यानंतर बोस यांनी काँग्रेस सोडली होती.” डोवाल पुढे म्हणाले, ”मी चांगले किंवा वाईट म्हणत नाही, पण भारतीय इतिहास आणि जागतिक इतिहासातील या लोकांमध्ये फार कमी साम्य आहे ज्यांच्यात प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस होते आणि ते सोपे नव्हते.”

    डोवाल म्हणाले, “नेताजी एकटे होते, त्यांना पाठिंबा देणारा जपानशिवाय दुसरा देश नव्हता. नेताजी म्हणाले होते की, मी पूर्ण स्वातंत्र्यापेक्षा कमी कशावरही तोडगा सहमत असणार नाही. त्यांना या देशाला केवळ राजकीयदृष्ट्या मुक्त करायचे नव्हते, तर लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यांना आकाशातील मुक्त पक्ष्यांसारखे वाटले पाहिजे.”

    ते म्हणाले, “नेताजींच्या मनात विचार आला की, मी इंग्रजांशी लढेन, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही. हा माझा हक्क आहे आणि तो मला मिळेल.” तसेच “सुभाषचंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. जिना म्हणाले होते की, मी एकच नेता स्वीकारू शकतो आणि ते म्हणजे सुभाषचंद्र बोस.” असेही डोवल यांनी सांगितले. याशिवाय, डोवाल यांनी, “माझ्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो. आयुष्यात आपले प्रयत्न महत्त्वाचे असतात किंवा परिणाम महत्त्वाचे असतात.” असेही म्हटले.

    If Netaji Subhash Chandra Bose was alive India would not have been partitioned  NSA  Ajit Dovals big statement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार