विशेष प्रतिनिधी
कानपूर :उत्तर प्रदेशात १० दिवस आधीच होळी साजरी केली जाईल. निवडणुकांचे निकाल १० मार्चला येणार आहेत. तेव्हाच रंगांची होळी धुमधडाक्यात सुरू होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.Holi will be celebrated in Uttar Pradesh 10 days in advance, believes Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी कानपूरमध्ये जाहीर सभा झाली. अकबरपूर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान म्हणाले, उत्तर प्रदेशच्या जनतेने २०१४ मध्ये त्यांना पराभूत केले, २०१७ मध्ये त्यांना पराभूत केले आणि २०१९ मध्ये पुन्हा एकदा पराभव केला आणि आता २०२२ मध्येही घराणेशाही असलेल्या पक्षांचा पुन्हा पराभव होईल.
घराणेशाही असलेल्या नेहमी पार्टनर का बदलतात? ते उत्तर प्रदेशच्या जनतेची सेवा कशी करणार? यापूर्वीच्या सरकारांनी राज्यातील जनतेची लूट केली आहे विरोधक आपल्या पराभवाचे खापर साथीदाराच्या माथी मारतात. या लोकांचे चालवले असते तर त्यांनी कानपूर आणि उत्तर प्रदेशातील इतर परिसरांना माफियागंज मोहल्ल्यांमध्ये बदलले असते.
यूपीमध्ये माफियागिरी अखेरच्या घटका मोजत आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले., २०१४ मध्ये येथे असे सरकार होते, जे गरिबांसाठी घरे बांधायला तयार नव्हते. आधीच्या सरकारांनी यूपीच्या सामथ्यार्ला न्याय दिला नाही. त्यांनी यूपी लुटली, रात्रंदिवस लुटले आणि इथल्या लोकांना गुन्हेगार-दंगलखोर-माफियांच्या स्वाधीन केले.
यूपीमधील दुसºया टप्प्यातील मतदानाचा जो कल येत आहे आणि पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे ४ गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. प्रथम- भाजप सरकार, योगींचे सरकार पुन्हा येणार आहे, ते पूर्ण जोशात येत आहे, ते वाजत-गाजत येत आहे. दुसरे- प्रत्येक जाती, वगार्चे लोक कुठल्याही विभाजनाशिवाय मतदान करत आहेत.
गाव, शहरातील लोक विभाजनाशिवाय, कोणताही संभ्रमात न पडता, एकजुटीने आपल्या उत्तर प्रदेशच्या जलद विकासासाठी मतदान करत आहेत. तिसरा- आपल्या माता, भगिनी आणि मुलींनी स्वत: भाजपच्या विजयाचा झेंडा फडकावला आहे. चौथी- माज्या मुस्लिम भगिनी मोदींना आशीर्वाद द्यायचे ठरवून शांतपणे,
कोणताही आवाज न करता घराबाहेर पडत आहेत. सुख-दु:खात ज्याचा उपयोग होतो तो आपलाच असतो, हे आपल्या मुस्लिम महिला-भगिनी-मुलींना माहिती आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
Holi will be celebrated in Uttar Pradesh 10 days in advance, believes Prime Minister Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या
- प्रा.वामन केंद्रे यांना राष्ट्रीय कालीदास सन्मान प्रदान
- हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान ; सहयाद्री देवराईचा व्हॅलेंटाईन डे राष्ट्रीय वृक्ष वडासोबत
- भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात घडण्याची राऊतांची भाषा; प्रत्यक्षात मंत्री बच्चू कडू, खासदार राजेंद्र गावितांनाही तुरुंगवासाची शिक्षा!!
- देशातील सर्वांत मोठा बँकिंग गैरव्यवहार करणारया एबीजी शिपयार्डचे यूपीए कनेक्शन उघड… सरकारी कंपनी विकली, १० हजार कोटींची कंत्राटेही व कर्जांची खिरापतही वाटली