• Download App
    तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत । Heavy rains, Floods in Tamil Nadu, Andhra Pradesh: disrupt life

    तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पुराचा हाहाकार: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

    वृत्तसंस्था

    वेल्लोर : तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. पूर आणि दुर्घटनांत १२ जण ठार, ९ जण जखमी आणि ३० जण बेपत्ता झाले आहेत. Heavy rains, Floods in Tamil Nadu, Andhra Pradesh: disrupt life

    तामिळनाडूत घर कोसळून ४ मुले, ४ महिलांसह ९ जण ठार तर ९ जण जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी वेल्लोर जिल्ह्यात घडली. गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांत शाळा बंदच आहेत. रस्त्यावर पुराचे वाहत आहे.



    आंध्र प्रदेशात ३ ठार

    आंध्र प्रदेशमधील कडापा जिल्ह्यात शुक्रवारी पुरात ३ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण बेपत्ता झाले आहेत. धरण फुटल्यामुळे चेय्येरू नदी दुथडी भरून वाहिले असून खेड्यांत पाणी शिरले. नंदालूरमध्ये एक मंदिरही पाण्यात बुडाले. शंकराच्या मंदिरात जमलेले भाविक पुराच्या पाण्यात अडकले.
    दरम्यान,तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रूपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रूपये जाहीर केले.

    Heavy rains, Floods in Tamil Nadu, Andhra Pradesh: disrupt life

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली