• Download App
    ईस्त्राएलकडून कृतज्ञतेने मदत, भारताला जीवरक्षक उपकरण|Grateful help from Israel, life-saving equipment to India

    ईस्त्राएलकडून कृतज्ञतेने मदत, भारताला जीवरक्षक उपकरण

    कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात केली आहे. ही सर्व उपकरणे विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील.Grateful help from Israel, life-saving equipment to India


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारताने केलेल्या मदतीच्या कृतज्ञतेने भारताचा प्रामाणिक मित्र असलसेल्या ईस्रायलने कोरोनाच्या संकटात मदतीचा ओघ सुरू केला आहे. ऑक्सिजन जनरेटर्स आणि रेस्पेरेटर्रस पाठविण्यास सुरूवात केली आहे.

    ही सर्व उपकरणे विमानाच्या सहाय्याने भारतात पाठविली जात आहेत. ही विमानं मंगळवारपासून सुरू होतील आणि साधारणपणे संपूर्ण आठवडाभरच सुरू राहतील.इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनजी यांनी म्हटले आहे, की भारत, इस्रायलचा सर्वात जवळचा आणि महत्वाचा मित्र आहे.



    दोन्ही देशांतील मैत्री घट्ट आहे. भारत आणि इस्रायल यांच्यात अनेक प्रकारचे राजकीय, संरक्षण आणि आर्थिक स्वरुपाचे करार आहेत. या कठीण काळात आम्ही पूर्णपणे भारतासोबत उभे आहोत. आम्ही आमच्या भारतीय भाऊ आणि बहिणींसाठी लाइफ सेव्हिंग उपकरणे पाठवत आहोत.

    या कार्यात सहकार्य करणारे लोक इस्रायलमधील मुख्य आर्थिक संस्था, इस्रायल-भारत चेम्बर ऑफ कॉमर्स, इस्रायल-एशिया चेम्बर ऑफ कॉमर्स, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इस्रायल, फेड्रेशन ऑफ इस्रायल चेम्बर्स ऑफ कॉमर्स यांच्या सहकायार्साठीही आभार मानले आहेत.

    इस्रायलने जारी केलेल्या एका निवेदनात, गेल्या वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात भारताने इस्रायलला केलेल्या मदतीचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्हाला आठवते,

    गेल्या वर्षी भारताने कोरोनो व्हायरस संकटाच्या सुरुवातीला, इस्रायलच्या मदतीसाठी कशा प्रकारे मास्क, हँड ग्लोव्हज औषधांसाठी कच्च्या मालासह अनेक गोष्ट्रींची मदत दिली होती. इस्रायली नागरिक सुरक्षित पोहोचण्यासाठीही मदत केली होती.

    रशियानेही भारताच्या मदतीसाठी नुकतीच दोन विमानं पाठविली आहेत. ही दोन्ही विमानं दिल्ली एअरपोर्टवर उतरली होती. रशियाने या दोन्ही विमानांत कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन, 75 व्हेंटिलेटर, 150 बेड साइड मॉनिटर आणि फॅबिपिराविर आषध पाठवले.

    Grateful help from Israel, life-saving equipment to India

    महत्त्वाची बातमी

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका