• Download App
    देशाने कट्टर देशभक्त सैनिक - महान सेनापती गमावला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट!! Gen Bipin Rawat was an outstanding soldier

    देशाने कट्टर देशभक्त सैनिक – महान सेनापती गमावला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या निधनामुळे देशाने एक कट्टर देशभक्त सैनिक आणि महान सेनापती गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Gen Bipin Rawat was an outstanding soldier

    जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचे तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. त्यानंतर पंतप्रधानांनी ट्विट करून जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

    सायंकाळी साडेसहा वाजता कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षणदलांचे तिन्ही प्रमुख लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंड नरवणे, हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी, नौदल प्रमुख ॲडमिरल हरिकुमार तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. यानंतर जनरल रावत यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात विषयी निर्णय घेण्यात आला.

    Gen Bipin Rawat was an outstanding soldier

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती