• Download App
    मोठी बातमी : अरब देशांना अन्नधान्य निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर, 15 वर्षांनंतर ब्राझीललाही टाकले मागे|After 15 years India left Brazil behind, became number one in exporting food grains to Arab countries

    मोठी बातमी : अरब देशांना अन्नधान्य निर्यातीत भारत पहिल्या क्रमांकावर, १५ वर्षांनंतर ब्राझीललाही टाकले मागे

    कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी बिघडल्याने व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, भारताने ब्राझीलला मागे टाकत आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 15 वर्षांनंतर भारताने ब्राझीलला मागे टाकून अरब देशांना अन्नधान्य निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी अरब-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सने ही आकडेवारी दिली आहे.After 15 years India left Brazil behind, became number one in exporting food grains to Arab countries


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे पुरवठा साखळी बिघडल्याने व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. दरम्यान, भारताने ब्राझीलला मागे टाकत आपल्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 15 वर्षांनंतर भारताने ब्राझीलला मागे टाकून अरब देशांना अन्नधान्य निर्यात करणारा सर्वात मोठा देश बनला आहे.

    रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी अरब-ब्राझिलियन चेंबर ऑफ कॉमर्सने ही आकडेवारी दिली आहे.अरब देशांसाठी ब्राझील हा महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे, परंतु कोरोना महामारीमुळे दोन्ही देशांमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.



    आकडेवारीनुसार, अरब देशांना रसद पुरवणाऱ्या 22 देशांपैकी ब्राझीलची निर्यात 8.15 टक्के होती, परंतु भारताने 8.25 टक्के बाजारपेठ काबीज केली आणि गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच अरब देशांना सर्वात मोठा अन्न निर्यात करणारा देश बनला.

    भारत, तुर्कस्तान, अमेरिका, फ्रान्स, अर्जेंटिना यांसारख्या पारंपारिक शिपिंग मार्गांमधील व्यत्ययांमुळे ब्राझीलने आपले स्थान गमावले. याचा फायदा भारताला मिळाला. अहवालानुसार, ब्राझीलला आता अरब देशांना अन्नधान्य निर्यात करण्यासाठी 30 ऐवजी 60 दिवस लागतात, तर भारत आपल्या भौगोलिक स्थितीमुळे अरब देशांना कमीत कमी वेळेत अन्नधान्य पुरवण्यात यशस्वी ठरला आहे.

    After 15 years India left Brazil behind, became number one in exporting food grains to Arab countries

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajya Sabha : राज्यसभा निवडणूक 2026 : 26 पैकी 23 उमेदवार बिनविरोध विजयी; खरगे, पवन खेडा यांचाही समावेश, उर्वरित 3 जागांसाठी 18 जूनला मतदान

    Shatrughan Sinha : TMC मधील बंडाच्या चर्चांमध्ये शत्रुघ्न सिन्हा ठाम; “ममता बॅनर्जीच माझ्या नेत्या, दुसरे कुणी मान्य नाही”

    नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारताचा गजर; न्यूनगंडी “विकासनशील” संकल्पना इतिहासजमा!!