विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांना राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही. असा निर्णय देखील अँटनी यांनी घेतला आहे. त्यासंबधी अँटनी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहले आहे.Former Congress Minister A. K.Antony’s retirement from politics, wrote a letter to Sonia Gandhi
त्यात त्यांनी आपण राजकारणात संन्यास घेत असल्याचे म्हटले आहे.ए. के अँटनी हे केरळहून राज्यसभेचे खासदार आहेत. येत्या 2 एप्रिल रोजी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपणार आहे. 1970 मध्ये अँटनी पहिल्यांदा केरळमध्ये आमदार झाले होते. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत.
गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निए. के. अॅँवडणुकीदरम्यान एके अँटनी म्हणाले होते की, आपण लवकरच राजकारणातून संन्यास घेणार आहोत. अँटनी यांचे वय 81 असून, गेल्या 51 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण काही महिन्यांपूर्वीच सोनिया गांधी यांना एक पत्र लिहले असून, राजकारणातून संन्यास घेत आहोत. अशी माहिती दिली आहे.अँटनी म्हणाले की, मला पक्षाने अनेकदा संधी दिल्या. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी आता राजकारणातून संन्यास घेत असून, लवकरच दिल्ली सोडून तिरुवनंतपुरम येथे जाणार आहेत.
एके अँटनी हे 10 वर्ष काँग्रेस संसदीय समितीचे प्रेसिटेंड होते. ते पाच वेळा राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार राहिले आहेत. यासोबतच ते तीनदा केंद्रीय मंत्री होते. अँटनी हे वयाच्या 37 व्या केरळचे मुख्यमंत्री झाले होते. आतापर्यंत ते तीनदा मुख्यमंत्री राहिले आहेत.