• Download App
    पंजाबधील शेतकऱ्यांना प्रथमच थेट बॅँक खात्यात मिळाली धान्याची किंमत, २०२.६९ कोटी रुपये किमान हमी भावाने|For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.

    पंजाबधील शेतकऱ्यांना प्रथमच थेट बॅँक खात्यात मिळाली धान्याची किंमत, २०२.६९ कोटी रुपये किमान हमी भावाने

    दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

    रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार किमान हमी भावाने धान्याची खरेदी किंमत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.



    त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही इतर खर्चाशिवाय आपल्या कष्टाचे मोल मिळाले आहे. पंजाब सरकारने थेट बॅँक खात्यात (डीबीटी) शेतकऱ्यांचे पैसे टाकून देण्यास परवानगी द्यावी यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत हेते.

    यंदाच्या वर्षी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने हे क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. अगदी वेळेत आपल्या पिकाचे पैसे मिळाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    यंदाच्या हंगामात देशात १२१.७ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. त्यातील ४४.८ लाख टन पंजाब आणि हरियाणातून तर २८.५ लाख टन मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात आलाआहे. देशातील ११.६ लाख शेतकऱ्यांना थेट बॅँक खात्यात पैसे मिळाले आहेत.

    For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा

    Ashok Gehlot : ‘सोनिया गांधींनी सांगितले असते तर मी काँग्रेस अध्यक्षपद नाकारले नसते’; अशोक गेहलोतांचा 2022 च्या घडामोडींमागे ‘कट’ असल्याचा आरोप