दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दलालांची व्यवस्था कायम ठेवण्यासाठी पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या थेट बॅँक खात्यात धान्याची किंमत टाकू देण्यास तयार नव्हते. परंतु, केंद्र सरकारच्या दट्याने अखेर राज्य सरकार तयार झाले. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
रब्बी हंगामात विकलेल्या धान्याचे २०२.६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार किमान हमी भावाने धान्याची खरेदी किंमत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही इतर खर्चाशिवाय आपल्या कष्टाचे मोल मिळाले आहे. पंजाब सरकारने थेट बॅँक खात्यात (डीबीटी) शेतकऱ्यांचे पैसे टाकून देण्यास परवानगी द्यावी यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत हेते.
यंदाच्या वर्षी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने हे क्रांतीकारी पाऊल उचलले आहे. अगदी वेळेत आपल्या पिकाचे पैसे मिळाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदाच्या हंगामात देशात १२१.७ लाख टन गव्हाचे उत्पादन झाले आहे. त्यातील ४४.८ लाख टन पंजाब आणि हरियाणातून तर २८.५ लाख टन मध्य प्रदेशातून खरेदी करण्यात आलाआहे. देशातील ११.६ लाख शेतकऱ्यांना थेट बॅँक खात्यात पैसे मिळाले आहेत.
For the first time, farmers in Punjab got foodgrains directly in their bank accounts at a minimum guaranteed price of Rs 202.69 crore.
महत्त्वाच्या बातम्या
- Nashik Oxygen Leak : नाशिकच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुख, मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर
- दुर्दैवी घटनेतही राजकारण : सचिन सावंतांनी नाशिकच्या घटनेसाठी भाजपला ठरवले जबाबदार, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर..
- Covaxin : कोरोनाच्या डबल म्युटेंटवरही कोव्हॅक्सिन परिणामकारक, संशोधनाअंती ICMRचा निष्कर्ष
- दुर्दैवाचा हृदय पिळवटून टाकणारा फेरा : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीनंतर 22 रुग्णांचा तडफडून मृत्यू! बळींची संख्या वाढण्याची भीती
- कॅप्टन कुल धोनीच्या घरीही कोरोनाचा शिरकाव, संसर्गानंतर धोनीचे आई-वडील रांचीतील रुग्णालयात दाखल