वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गाजीपुर सिंघू, टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खुल्या होताच भारतीय किसान युनियन पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना आम्ही पार्लमेंटमध्ये जाऊन आमचे धान्य विकू, असे म्हटले आहे. farmers will go to Parliament and sell their grain; Rakesh Tikait warns Modi government
कोर्टाच्या आदेशानुसार दिल्ली तसेच हरियाणा पोलिसांनी आज सिंघू, गाजीपुर टिकरी आदी दिल्लीच्या बॉर्डर्स खोलल्या. तिथले बॅरिकेट्स हटवले. आंतरराज्य वाहतूक यामुळे सुरळीत होईल, असे वक्तव्य दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थना यांनी केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान या बॉर्डर बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता त्या खुल्या झाल्याने एक सकारात्मक वातावरण तयार होईल, असे मत देखील यांनी व्यक्त केले आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत मात्र यांनी मात्र मोदी सरकारला धारेवर धरले आहे. मुळात दिल्लीच्या बॉर्डर शेतकरी आंदोलकांनी बंद केल्या नव्हत्या. पोलिसांनी त्या बंद केल्या असल्याचा दावा टिकैत यांनी केला.
त्याच वेळी टिकैत यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर भारतातला शेतकरी कुठेही धान्य विकू शकतो असे म्हणतात तर आता आम्ही दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये जाऊन आमचे धान्य विकू, असे वक्तव्य केले आहे.
यातून एक प्रकारे मोदी सरकारला त्यांनी पार्लमेंटला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. याआधी देखील राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी पार्लमेंटला घेराव घालण्याचा इशारा दिला आहेच.
farmers will go to Parliament and sell their grain; Rakesh Tikait warns Modi government
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खानच्या जेवणा – झोपण्याची काळजी करणारे सरकार 28 एसटी कामगार गेले तरी बेपर्वा; गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र
- WATCH : एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे गोपीचंद पडळकर यांची परिवहन मंत्र्यांना विनंती
- Farmers Protest : गाझीपूर बॉर्डरवरून बॅरिकेडिंग हटवण्यावर राहुल गांधी म्हणाले- लवकरच तीनही कृषी कायदेही हटवले जातील!
- नवाब मलिकांच्या आरोपांनंतर फॅशन टीव्हीच्या काशिफ खानचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘कोणत्याही पॉर्न किंवा ड्रग रॅकेटशी काहीही संबंध नाही’