• Download App
    फोन टाॅपिंगच काय?, माझ्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् "ते" हॅक करताहेत; प्रियांका गांधी यांचा खळबळजनक आरोप!! even hacking my children's Instagram accounts, let alone phone tapping. Do they not have any other work

    फोन टाॅपिंगच काय?, माझ्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् “ते” हॅक करताहेत; प्रियांका गांधी यांचा खळबळजनक आरोप!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही करतात. पण आता माझ्या मुलांची देखील इंस्टाग्राम अकाउंटस् ते हॅक करत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. even hacking my children’s Instagram accounts, let alone phone tapping. Do they not have any other work

    काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज दुपारीच लिंचींग हा शब्द 2014 नंतर आला, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यावरून राजकीय गदारोळ उठला असतानाच प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक करण्याचा आरोप करून नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. त्या लखनऊ मध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

    उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नातेवाईकांवर ईडी आणि आयटीचे छापे पडत आहेत. याबाबत प्रश्न विचारले असता प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. आता यावर सरकारच्यावतीने नेमके कोण आणि काय काय उत्तर देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

    even hacking my children’s Instagram accounts, let alone phone tapping. Do they not have any other work

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दिल्ली मेट्रोशी तुलना करून न्यूयॉर्क मेट्रोची पोलखोल; सगळीकडे घाण, सांडपाणी आणि कचऱ्याने भरलेले डबे गोल!!

    Satara Suicide Case : सातारा आत्महत्या प्रकरणात महिलेचा आरोप- डॉक्टरने मुलीच्या बनावट पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सही केली, नैसर्गिक मृत्यू दाखवला

    Election Commission : आज देशभरात SIRच्या तारखा जाहीर केल्या जातील; निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार