उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या का? दिल्लीत निवडणुका होत्या का? महाराष्ट्र किंवा दिल्लीमध्ये कुंभमेळा होता का? असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.Elections in Uttar Pradesh increased Corona, then what elections were held in Maharashtra? Question from Chief Minister Yogi Adityanath
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या का? दिल्लीत निवडणुका होत्या का? महाराष्ट्र किंवा दिल्लीमध्ये कुंभमेळा होता का? असा सवाल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांमुळे रुग्णवाढ झाली, मृतांचे आकडे लपवण्यासाठी गंगेमध्ये मृतदेह टाकून देण्यात आले असे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना रुग्णवाढीसंदर्भात थेट महाराष्ट्र आणि दिल्लीशी तुलना केली आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, मृत्यूचे आकडे लपवणं हे पाप आहे. पण कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढा देणाऱ्या एका व्यवस्थेसोबत आपलीही जबाबदारी काय असायला हवी? लोकांचं मनोबल वाढवणं की त्यांच्यात भिती निर्माण करणं? मी बघत होतो की बरेच लोक चांगले होते, पण इतकी भिती आणि चिंता निर्माण केली जात होती, की लोक म्हणायचे आम्ही आता मरून जाऊ.
मला आश्चर्य वाटायचं. इतके भितीचें वातावरण निर्माण केले गेले होते. आपण स्मशानभूमीचं चित्र दाखवत होतो आणि सांगत होतो की हॉस्पिटलमध्ये एक आकडेवारी दिली जातेय आणि घाटावर इतके मृत्यू होत आहेत. मी म्हणतो घरात इतर कारणांनी मृत्यू होणाऱ्याचे देखील अंत्यसंस्कार होतच होते.पण त्या नावावर संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात होत्या.
भितीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं. करोनामुळे हे सगळे मृत्यू होत आहेत असं भासवल्यामुळे परिस्थिती अधिक बिघडली.आपण करोनासाठी आस्थेला किंवा संविधानात्मक संस्थांना लक्ष्य करू लागलो, तर ते चूक होईल. तो अन्याय होईल. हे या शतकातलं सगळ्यात मोठं संकट आहे. आपल्याला या संकटाविरुद्ध सामुहिकपणे लढा द्यावा लागेल. ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण सगळे एकत्र येऊन लढलो, तर ते मानवतेसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
Elections in Uttar Pradesh increased Corona, then what elections were held in Maharashtra? Question from Chief Minister Yogi Adityanath