• Download App
    Donald Trump Birthday : भारतातील या मोठ्या शहरांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय, 2013 पासून झाली निवासी प्रकल्पांना सुरुवात|Donald Trump Birthday Trump's business is in these big cities of India

    Donald Trump Birthday : भारतातील या मोठ्या शहरांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय, 2013 पासून झाली निवासी प्रकल्पांना सुरुवात

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज वाढदिवस आहे. ते 77 वर्षांचे झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे एक यशस्वी राजकारणी तसेच यशस्वी उद्योजकही आहेत. ट्रम्प यांचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. ट्रम्प यांचा भारतातील अनेक मोठ्या शहरांत व्यवसाय आहे. मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथे त्यांचा व्यवसाय आहे.Donald Trump Birthday Trump’s business is in these big cities of India

    व्यावसायिक संबंधांमुळे ट्रम्प कुटुंब सतत भारतात येत असते. त्यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर व्यवसायानिमित्त भारतात आला आहे. 2018 मध्ये, ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर पुण्यातील ट्रम्प टॉवर्सच्या दुसऱ्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आला होता.



    ट्रम्प कुटुंबाने भारतात रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे आणि या प्रकल्पाचे नाव देखील ट्रम्प यांच्याशी जोडले गेले आहे. देशातील मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि कोलकाता येथील निवासी भागात तुम्हाला ‘ट्रम्प टॉवर’ पाहायला मिळेल.

    भारतात ट्रम्प यांची कंपनी लोढा ग्रुप, पंचशील रियल्टी, M3M, Tribeca, Unimark आणि Ireo यांच्या सहकार्याने रिअल इस्टेट व्यवसायाचा विस्तार करत आहे. भारतीय कंपन्यांचे म्हणणे आहे की, या प्रकल्पाशी ट्रम्प यांचे नाव जोडले गेल्याने फ्लॅटच्या किमती उच्च असून मागणीही कायम आहे.

    गुरुग्राममधील ट्रम्प टॉवर

    दिल्लीला लागूनच गुरुग्राममध्ये ट्रिबेका ट्रम्प टॉवर्स आहे, ज्यामध्ये ट्रम्प यांची गुंतवणूक आहे. हे गुरुग्रामच्या सेक्टर 65 मध्ये आहे. गुरुग्राममध्ये दोन 50 मजली 2 ट्रम्प टॉवर्स आहेत आणि त्यांचा विस्तार केला जात आहे. येथील फ्लॅटची सुरुवातीची किंमत 4 कोटींहून अधिक आहे.

    कोलकात्यात ट्रम्प टॉवर

    भारतीय कंपनी युनिमार्क ग्रुप, आरडीबी ग्रुप आणि ट्रिबेका डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने कोलकाता येथे ‘ट्रम्प टॉवर’ उभारण्यात आला आहे. या टॉवरची उंची 39 मजली आहे. कोलकाता येथील ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटची सुरुवातीची किंमत 3.75 कोटी रुपये आहे.

    मुंबईतील ट्रम्प टॉवर

    मुंबईच्या वरळी भागातही ‘ट्रम्प टॉवर’ आहे. 700 एकरात पसरलेल्या या निवासी इमारतींच्या फ्लॅटची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. वरळीत 78 मजली इमारत आहे. लोढा ग्रुपच्या मदतीने येथील प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रायव्हेट जेट सर्व्हिस आणि ट्रम्प कार्ड ही त्याची खासियत आहे. येथील फ्लॅटची सुरुवातीची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.

    पुण्यातील ट्रम्प टॉवर

    पंचशील रियल्टीच्या सहकार्याने पुण्यात ट्रम्प टॉवर्स बांधण्यात आले आहेत. पुण्यात ‘ट्रम्प टॉवर’ नावाच्या दोन 23 मजली इमारती आहेत. ट्रम्प टॉवरमधील फ्लॅटची किंमत 15 कोटींहून अधिक आहे.

    ट्रम्प यांच्या कंपनीने 2013 मध्ये पहिल्यांदा भारतात प्रवेश केला. आणि गेल्या 9 वर्षांत ट्रम्प यांचा व्यवसाय भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पसरला आहे. ट्रम्प यांच्या कंपनी ‘द ट्रम्प ऑर्गनायझेशन’ने भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने 50 हून अधिक लक्झरी निवासी प्रकल्प सुरू केले आहेत.

    Donald Trump Birthday Trump’s business is in these big cities of India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया