• Download App
    एक वर्षांत पश्चिम बंगालमधील रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांची रवानगी मायदेशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका|Deport Rohingya and Bangladeshi infiltrators from West Bengal within a year, petition to Supreme Courte%

    एक वर्षांत पश्चिम बंगालमधील रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांची रवानगी मायदेशी करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

    पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारला मुदत द्यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.Deport Rohingya and Bangladeshi infiltrators from West Bengal within a year, petition to Supreme Court


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून त्यांची रवानगी मायदेशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. एका वर्षाच्या आत सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकारला मुदत द्यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

    मानवाधिकार कार्यकर्त्या संगीता चक्रवर्ती यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा संदर्भही देण्यात आला आहे. बांगलादेशी घुसखोरांना देशात सहज आधारकार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र मिळतं याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.



    घुसखोरांना मदत करणाऱ्या सरकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांची ओळख पटवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणीही या याचिकेत केली आहे. अशा अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करावी. सरकारी अधिकारी, ट्रॅव्हल एजेंट आणि मदत करणाºया व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

    घुसखोरांना मदत केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कायदा आणखी कडक करावा आणि गुन्हा अजामिनपात्र करण्याची सुचना देखील करण्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे पश्चिम बंगालमध्ये लूटपाट, मारहाण आणि अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याकडेही लक्ष वेधण्यात आलं आहे. बांगलादेशी घुसखोरांची संख्या ५ कोटींच्या घरात पोहोचली आहे.

    त्यामुळे देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. संविधानातील अनुच्छेद १९ चा यासाठी संदर्भ देण्यात आला आहे. भारतात मोकळेपणाने फिरण्याचा अधिकार फक्त भारतीयांना आहे. घुसखोरांना नाही, असेही या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.

    Deport Rohingya and Bangladeshi infiltrators from West Bengal within a year, petition to Supreme Court

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!