• Download App
    मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला । Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital

    मोठी बातमी : पाकिस्तानी दहशतवाद्याला एके-47 सह दिल्लीत अटक, देशाच्या राजधानीत घातपाताचा कट उधळला

    Delhi Police : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी राजधानीत घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होता. स्पेशल सेलने दहशतवाद्याकडून एके -47 आणि हातबॉम्बदेखील जप्त केला आहे. हा दहशतवादी भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने तयार केला होता. दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी राजधानीत घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होता. स्पेशल सेलने दहशतवाद्याकडून एके -47 आणि हातबॉम्बदेखील जप्त केला आहे. हा दहशतवादी भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने तयार केला होता. दहशतवाद्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.

    दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सांगितले की, मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीला सोमवारी रात्री 9.20 वाजता दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागातून अटक करण्यात आली. मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्याचा रहिवासी आहे.

    मोहम्मद अशरफ भारतीय नागरिक म्हणून वावरत होता. यासाठी त्याने आपले बनावट नाव मोहम्मद नूरी ठेवले होते आणि बनावट ओळखपत्रही बनवले होते. दिल्लीतील शास्त्रीनगरमधील आराम पार्क परिसरातील एका घरात तो राहत होता. त्याने भारतीय ओळखपत्र बनवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरली होती.

    सूत्रांकडून कळले आहे की, हा दहशतवादी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी आला होता. आयएसआयने त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर तो नेपाळमार्गे भारतात दाखल झाला.

    स्पेशल सेलने त्याच्याकडून एक हँडबॅग, दोन मोबाइल फोन जप्त केले. त्याच्याकडून एके -47, मॅगझिन आणि 60 गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्या जागी कालिंदी कुंज घाटातून एक हातबॉम्ब, दोन पिस्तूल आणि 50 काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. कालिंदी कुंजजवळ यमुनेच्या किनाऱ्यावरील वाळूखाली ही शस्त्रे पुरलेली होती. तुर्कमन गेट परिसरातून एक भारतीय पासपोर्टदेखील जप्त केला आहे.

    आरोपी मोहम्मद अशरफ ऊर्फ ​​अलीविरुद्ध यूएपीए, स्फोटक कायदा, शस्त्र कायदा यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी नगरमधील रमेश पार्क येथील त्याच्या अड्ड्यावरही शोध घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात तो एका मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता, असे पोलिसांचे मत आहे. पोलीस पथक त्याची चौकशी करत आहे आणि भारतात त्याला कोण मदत करत होते, नेपाळमार्गे तो कोणत्या मार्गाने भारतात पोहोचला आणि या संपूर्ण षडयंत्रात त्याचे सहाय्यक कोण आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

    Delhi Police arrest Pakistani terrorist, avert major terror attack in capital

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!