• Download App
    ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये । ADR Reports Donations Of 14 Regional Parties Including Shiv Sena 50 Percent From Electoral Bonds

    ADR : शिवसेनेसह 14 पक्षांना निवडणूक रोख्यांमधून 50 टक्के देणगी, टीआरएसला मिळाले 130 कोटी रुपये

    ADR : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. ADR Reports Donations Of 14 Regional Parties Including Shiv Sena 50 Percent From Electoral Bonds


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या माहितीनुसार, शिवसेना, आप, द्रमुक आणि जेडीयूसह चौदा प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 447.49 कोटी रुपयांची देणगी इलेक्टोरल बॉण्डद्वारे प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे.

    ही रक्कम या पक्षांच्या उत्पन्नाच्या 50.97 टक्के इतकी आहे. पोल राइट ग्रुपच्या अहवालानुसार, 2019-20 मध्ये देशभरातील 42 प्रादेशिक पक्षांचे एकूण उत्पन्न 877.957 कोटी रुपये होते.

    टीआरएस, टीडीपी, वायएसआर-सी, बीजेडी, डीएमके, शिवसेना, आप, जेडीयू, सपा, जेडीएस, एसएडी, एआयएडीएमके, आरजेडी आणि जेएमए हे त्या 42 पक्षांपैकी 14 क्षेत्रीय पक्ष आहेत ज्यांनी निवडणूक रोख्यांतून देणगी मिळाल्याचे जाहीर केले आहे.

    टीआरएस टॉपर, 130.46 कोटी रुपयांची देणगी

    प्रादेशिक पक्षांमध्ये, टीआरएस सर्वाधिक 130.46 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. ही रक्कम सर्व पक्षांच्या एकूण देणगीच्या 14.86% इतकी आहे. शिवसेनेला 111.403 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. दुसरीकडे, वायएसआर काँग्रेसला 92.739 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.

    ADR Reports Donations Of 14 Regional Parties Including Shiv Sena 50 Percent From Electoral Bonds

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nirav Modi : फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते; युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात बंद

    Microsoft : मायक्रोसॉफ्टने 4,800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; एआय इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च वाढल्यामुळे निर्णय; कंपनीचा शेअर 6 महिन्यांत 20% घसरला

    राम मंदिरातल्या चोरी बद्दल कांगावा करणारे काँग्रेस आणि समाजवादी नेते वफ्फची हजारो हेक्टर जमीन विकली गेली तेव्हा बोलले का??; योगी आदित्यनाथ यांचा परखड सवाल!!