• Download App
    गोव्यात काँग्रेसचा "शिंदे पॅटर्न" रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!|Congress president Sonia Gandhi entrusted responsibility on mukul wasnik to prevent split in goa Congress

    गोव्यात काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी सोनिया गांधींची मुकुल वासनिकांवर जबाबदारी!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत करत असल्याची बातमी आहे. काँग्रेसने हे बंड रोखण्यासाठी मायकेल लोगो यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपद काढून घेतले आहे दिगंबर कामत यांच्या विरुद्ध देखील कारवाईची शक्यता आहे.Congress president Sonia Gandhi entrusted responsibility on mukul wasnik to prevent split in goa Congress

    भाजपच्या गोटात जायला आठवा आमदार तयार नसल्यामुळे तात्पुरते बंड फासल्याची पण बातमी आहे. पण तरी देखील गोव्यातली परिस्थिती काँग्रेसमधील घडामोडींमुळे अस्थिर बनली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारला धोका नाही. कारण सरकारकडे बहुमत आहे.



    पण आता गोव्यातला हा “शिंदे पॅटर्न” रोखण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्यावर गोव्याची खास जबाबदारी सोपवली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आर. गुंडू राव यांचे पुत्र दिनेश गुंडू राव हे गोव्या काँग्रेसचे प्रभारी आहेत. त्यांनी आमदारांचे बंड रोखण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हे बंड कितपत रोखले गेले आहे?, याविषयी काँग्रेस श्रेष्ठींना शंका आहे. म्हणूनच खासदार मुकूल वासनिक यांना तातडीने गोव्यात दाखल व्हायला काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले आहे. या संदर्भात रात्री उशिरा काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदारांचे बंड यशस्वी होऊन सरकार स्थापन झाले. आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे गोव्यात दाखल झाल्याची माहिती आहे.

    गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. परवा शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

    Congress president Sonia Gandhi entrusted responsibility on mukul wasnik to prevent split in goa Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक