विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे तरुण राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न चालवला आहे. रजनी पाटील यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेसला आपल्याच आघाडीतील मित्र पक्षांकडून दगाफटका होणार तर नाही ना याची भीती वाटत आहे. त्यातूनच महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचा ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे.Congress pitching for unopposed rajya sabha election in Maharashtra
ठाकरे – पवार सरकारचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आहे. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना रजनी पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये, अशी विनंती करणार आहेत. महाराष्ट्रात कोणत्याही विद्यमान खासदार यांचे निधन झाले तर शक्यतो बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे. ही परंपरा भाजपचे नेते पाळतील, असा मला विश्वास वाटतो. मी देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले.
रजनी पाटील यांचे नाव राज्यपाल नियुक्त १२ विधानपरिषद आमदारांच्या यादीतही होते. परंतु, ते काढून त्यांना राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसने दिली आहे. या उमेदवारीवर कदाचित राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नाराज असू शकतात. कारण त्यांना आघाडीमध्ये त्यांच्या सोयीनुसार “राजकीय ॲडजस्टमेंट” करायचा असतात. या आधीची त्यांची “ॲडजस्टमेंट” काँग्रेसने नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला लावून मोडीत काढली. नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केले. विधानसभेचे अध्यक्षपद आज आठ महिन्यानंतरही रिकामेच ठेवावे लागले आहे.
त्यात रजनी पाटील यांच्या उमेदवारीची भर पडली आहे. आधीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह होशियारी हे शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हवे असलेल्या १२ आमदारांची विधान परिषदेवर नियुक्ती करत नाहीत. त्यात काँग्रेसने आधी सुचविलेले रजनी पाटील यांचे नाव या यादीतून काढून घेतले आहे.
आता ही यादी बदलावी लागेल आणि या प्रक्रियेमध्ये भरपूर वेळ जाईल. त्यामुळे शरद पवार हे काँग्रेसच्या या खेळीवर नाराज असू शकतात. याचा वचपा ते राज्यसभेची निवडणूक झाली तर काढू शकतात ही भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांचा रजनी पाटील यांची राज्यसभेवरची निवड बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनचकाँग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संधान साधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Congress pitching for unopposed rajya sabha election in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- यूपी एटीएस खुलासा: धर्मांतराची देशव्यापी सिंडिकेट चालवल्याबद्दल मौलानाला अटक, बहरीनकडून ट्रस्टला मिळाले 1.5 कोटी रुपये
- राज्यात अत्याचार थांबेनात : पुण्यात विवाहितेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, एका आरोपीला अटक, इतरांचा शोध सुरू
- कॅलिकत युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा ‘हुंडा घेणार नसल्याचा’ बॉंड
- तालिबानला आता संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची इच्छा, सोहेल शाहीन यांची संयुक्त राष्ट्र दूत म्हणून नियुक्ती