विशेष प्रतिनिधी
डेहराडून : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उत्तराखंड सरकारचे विमान वापरण्यास कॉँग्रेसने विरोध केला आहे. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या राज्याच्या तिजोरीवर हा भार असून नियमांचाही भंग असल्याचे कॉँग्रेस मीडिया सेलच्या प्रमुख गरिमा दसौनी यांनी म्हटले आहे.Congress opposes use of Maharashtra Governor Koshyari using Uttarakhand aircraft
गरिमा दसौनी यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने राज्य विमानात कोश्यारी यांना उत्तराखंडला पाठवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची होती. मात्र, त्यांच्यासाठी उत्तराखंडचे विमान वापरण्यात आले. उत्तराखंडच्या अगोदरच कमी असलेल्या संसाधनांवर यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे.
राज्यावर अगोदरच ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. या प्रकारांमुळे त्यात आणखी भर पडत आहे.दसौनी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना आपल्या राजकीय गुरूला आलिशान पाहुणचार द्यायचा होता तर त्यांनी राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार टाकण्याऐवजी आपल्या वैयक्तिक खर्चाने ते करायला हवे होते.
याबाबत राज्यमंत्री धनसिंह रावत म्हणाले की, कॉंग्रेसने या विषयावर बोलण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कोश्यारी यांचे होणारे आदरातिथ्य देण्यात पूर्णपणे योग्य आहे. याचे कारण माजी मुख्यमंत्री आहेतच पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे सेवा करणारे राज्यपालही आहेत. ते स्टेट गेस्ट म्हणून उत्तराखंडमध्ये येत असतात.
Congress opposes use of Maharashtra Governor Koshyari using Uttarakhand aircraft
महत्त्वाच्या बातम्या
- बदु्रुद्दीन अजमलच्या एआययूडीएफशी चुंबाचुबी केल्यावर कॉँग्रेसला उपरती, भाजपशी संबंध असल्याचा आरोप करत एआययूडीएफशी आघाडी तोडली
- अफगाणिस्तान सोडण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता, परंतु मिशन यशस्वी झाले – बायडेन
- आईच्या प्रियकराकडून बलात्कार, पीडित तरुणीला उच्च न्यायालयाने दिलीगर्भपाताची परवानगी
- व्हॉट्सॲपने भारतात 3 दशलक्ष खात्यांवर बंदी घातली, ती का? वाचा सविस्तर