विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधींनी केलेल्या अपमानाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाने आणि शिवसेना – भाजपने एकच भूमिका मांडून काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले. शेवटी शरद पवारांना सावरकर मुद्द्यावर राहुल गांधींना सुनवावे लागले, पण तरीही काँग्रेसच्या मूळ भूमिकेत बदल झाला नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. कारण हरीश रावत आणि अशोक चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये सावरकरांच्या कथित माफीनाम्याविषयी समान भूमिका मांडली आणि राहुल गांधींच्या जुन्याच मुद्द्याचे समर्थन केले.Congress on back foot over savarkar insult issue, sharad Pawar mediation failed, two former chief ministers supports rahul Gandhi
– हरीश रावत यांचे राहुल समर्थन
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत म्हणाले, की राहुल गांधींनी सावरकरांविषयी जे म्हटले आहे, ते ऐतिहासिक तथ्य आहे. पण काँग्रेसने एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून वीर सावरकरांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने काही सावरकरांवर हल्लाबोल केलेला नाही. पण राहुल गांधी जे बोलले ते ऐतिहासिक तथ्य आहे. त्यांचा उद्देश फक्त भाजपला आरसा दाखवण्याचा होता. हरीश रावत यांच्या या वक्तव्यातून त्यांनी राहुल गांधींच्या जुन्याच भूमिकेची त्यांनी री ओढल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावरकर मुद्द्यावर मतभेद : अशोक चव्हाण
दुसरीकडे तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर शिवसेनेची मतभेद असल्याचे स्पष्ट करून ते आजही कायम असल्याचे सांगितले. इतकेच नाही, तर महाराष्ट्रात 2019 मध्ये विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेनेनेच काँग्रेसकडे एकत्र येऊन सरकार बनवण्याचा प्रस्ताव पाठविला होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने तो स्वीकारला. पण त्यावेळी देखील सावरकरांसारख्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे मतभेद आहेत हे आम्हाला पक्के माहिती होते. पण त्यावेळी सावरकरांचा मुद्दा तेवढा पुढे आलेला नव्हता, असे अशोक चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यातून देखील सावरकरांविषयी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही हेच स्पष्ट झाले आहे.
पवारांची मध्यस्थी फेल
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काल झालेल्या बैठकीत शरद पवारांनी मध्यस्थी करून सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. ते मान्य करावेच लागेल, असे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना सुनावले होते. त्याच्या बातम्या देखील मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. त्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. परंतु हरीश रावत आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी आणि माजी मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये सावरकरांसंदर्भात जी भूमिका राहुल गांधींनी मांडली होती, तिचेच ऐतिहासिक तथ्य म्हणून समर्थन केल्याने काँग्रेसच्या मूळ भूमिकेत बदल झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता शिवसेनेचा ठाकरे गट यापुढे काँग्रेसशी संबंध ठेवण्याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Congress on back foot over savarkar insult issue, sharad Pawar mediation failed, two former chief ministers supports rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद; पण महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी तेच काँग्रेसकडे आले; अशोक चव्हाणांचे शरसंधान
- ‘’मुंबई महानगरपालिकेतील ८ हजार ४८५ कोटींच्या घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करा’’ आशिष शेलारांनी मुख्यमंत्री शिंदेंना पाठवले पत्र!
- भगतसिंह कोश्यारींचा हेतू महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, तर समाजप्रबोधनाचा होता – मुंबई उच्च न्यायालय
- ‘’जीवनात हीच कामं आपल्याला आशीर्वादरूपी मदत करतात’’ म्हणत जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केल्या भावना!