• Download App
    काँग्रेसची अशोक चव्हाणांनाही नवी असाइनमेंट; ५ राज्यांमधल्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी... पण यातले नेमके राजकीय संकेत काय...?? Congress constitutes a 5-member group under chairmanship of Ashok Chavan to evaluate recently concluded Assembly elections results

    काँग्रेसची अशोक चव्हाणांनाही नवी असाइनमेंट; ५ राज्यांमधल्या पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी… पण यातले नेमके राजकीय संकेत काय…??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – काँग्रेस श्रेष्ठींचे “राजकीय कार्ड” परवापासून ऍक्टीव्हेट झालेले दिसते आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेतली. पक्षाध्यक्षांची निवडणूक अनिश्चित काळापर्यंत लांबवून घेतली. Congress constitutes a 5-member group under chairmanship of Ashok Chavan to evaluate recently concluded Assembly elections results

    आणि आज पक्षातल्या जुन्या – जाणत्या नेत्यांना एक नव्हे, तर दोन असाइनमेंट देऊन टाकल्या. गुलाम नबी आझादांना कोरोना प्रतिबंधक टास्क फोर्सचे प्रमुख केले. तर महाराष्ट्रातले मंत्री अशोक चव्हाणांना ५ राज्यांमधल्या काँग्रेसच्या पराभवाची कारणे शोधणासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख नेमले  आहे. अर्थात ही नवीन असाइनमेंट अशोक चव्हाणांची राज्याच्या राजकारणातून उचलबांगडी करून त्यांना काँग्रेसच्या केंद्रीय राजकारणात आणण्याचे राजकीय संकेत तर नव्हेत ना…, अशी चर्चा दिल्ली – मुंबईतल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.



    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आधीच अशोक चव्हाण हे महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत. अनेक मराठा संघटनांनी त्यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप लावला आहे. अशा स्थितीत कदाचित त्यांना राज्याच्या राजकारणातून बाजूला करून केंद्राच्या काँग्रेसच्या राजकारणातही सक्रीय करण्याचा विचार बळावलेला असू शकतो. निदान आज त्यांना देण्यात आलेल्या असाइनमेंटवरून तरी तसे दिसत आहे.

    पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये तक काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. या पराभवाची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना सांगण्याचे काम अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. या समितीत सलमान खुर्शीद, मनीष तिवारी, व्ही. पाला आणि ज्योती मणी यांचा समावेश आहे.

    Congress constitutes a 5-member group under chairmanship of Ashok Chavan to evaluate recently concluded Assembly elections results

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!