• Download App
    काश्मीर मुद्द्यावर चीनने दिली पाकिस्तानला साथ, श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागाला नकार|China supports Pakistan on Kashmir issue, refuses to participate in G-20 meeting to be held in Srinagar

    काश्मीर मुद्द्यावर चीनने दिली पाकिस्तानला साथ, श्रीनगरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत सहभागाला नकार

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 बैठकीत चीन सहभागी होणार नाही. पुढील आठवड्यात श्रीनगर येथे होणाऱ्या प्रस्तावित G-20 पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे चीनने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, ‘वादग्रस्त भागात’ कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यास चीनचा ठाम विरोध आहे. चीन हा पाकिस्तानचा जवळचा मित्र आहे.China supports Pakistan on Kashmir issue, refuses to participate in G-20 meeting to be held in Srinagar

    भारत 22 ते 24 मेदरम्यान श्रीनगरमध्ये तिसऱ्या G-20 पर्यटन कार्यगटाचे आयोजन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, श्रीनगरमधील जी-20 बैठक ही जम्मू-काश्मीरसाठी आपली खरी क्षमता दाखवण्याची उत्तम संधी आहे. श्रीनगरमधील या कार्यक्रमामुळे देश आणि जगाला सकारात्मक संदेश जाईल, असे ते म्हणाले.



    चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी एका पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “विवादित भूभागावर कोणत्याही प्रकारची G20 बैठक घेण्यास चीन ठाम विरोध करतो. आम्ही अशा बैठकांना उपस्थित राहणार नाही.”

    पाकिस्तान आणि चीनने यापूर्वीही जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाबाबत वक्तव्ये केली आहेत. या दोन्ही देशांचे वक्तव्य भारताने फेटाळून लावले आहे.

    परराष्ट्र मंत्रालयाने दिले उत्तर

    भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की, “आम्ही सातत्याने अशी विधाने नाकारली आहेत आणि या प्रकरणांवरील आमची स्पष्ट भूमिका संबंधित सर्व पक्षांना चांगलीच माहिती आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत आणि नेहमीच असतील. इतर कोणत्याही देशाला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही.”

    गलवान खोऱ्यात चकमकीनंतर संबंध तणावपूर्ण

    2020 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. जोपर्यंत सीमा भागात शांतता नाही तोपर्यंत द्विपक्षीय संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे भारताने म्हटले आहे.

    पाकिस्ताननेही केला निषेध

    यापूर्वी पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 आयोजित करण्याच्या भारताच्या योजनेलाही विरोध दर्शवला होता. पाकिस्तानने काश्मीरमध्ये जी-20 आयोजित करण्याचा भारताचा प्रयत्न नाकारल्याचे म्हटले होते. कायदा आणि न्यायासाठी जी-20 सदस्य देश या प्रस्तावाला स्पष्टपणे विरोध करतील अशी आशा आहे, असे पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात आले.

    China supports Pakistan on Kashmir issue, refuses to participate in G-20 meeting to be held in Srinagar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!