• Download App
    पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा|Chief Electoral Office (CEO) West Bengal has called for an all-party meeting asking all political parties to adhere to cOVID19 guidelines mandated by the Election Commission of India (ECI) for strict compliance:

    पश्चिम बंगालमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचारावर चर्चा

    वृत्तसंस्था

    कोलकाता :  पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कोविड प्रोटोकॉल पाळून प्रचार करण्याच्या विषयावर या बैठकीत विचार विनिमय होणे अपेक्षित आहे.Chief Electoral Office (CEO) West Bengal has called for an all-party meeting asking all political parties to adhere to cOVID19 guidelines mandated by the Election Commission of India (ECI) for strict compliance:

    कोविड प्रोटोकॉल पाळून रॅली, रोड शो, छोट्या – मोठ्या सभा घ्याव्यात अन्यथा प्रचारावर निर्बंध आणावे लागतील, असा इशारा निवडणूक आयोगाने यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांना दिला आहे.



    सर्व राजकीय पक्ष प्रचारात जोरात असले, तरी सत्ताधारी तृणमूळ काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रचारात लोकांची तुफान गर्दी होताना दिसते आहे. यातून कोरोना प्रकोप होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने मास्क आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्याच्या सूचना राजकीय पक्षांना दिल्या आहेत.

    नेते या सूचना काही प्रमाणात पाळताना दिसत आहेत. पण तरीही कोरोना फैलावाचा धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.

    मतदानाच्या टप्प्यांमध्ये बदल नाही

    कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मतदानाच्या टप्प्यांमध्ये बदल करून ते कमी करण्यात येतील, अशा अफवा सोशल मीडियातून पसरविण्यात आल्या होत्या. त्या अफवांवर निवडणूक आयोगाने पडदा टाकला आहे.

    मतदानाचे टप्पे आधी नियोजित आणि जाहीर केल्याप्रमाणेच पार पडतील. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता मतदानाचे ३ टप्पे राहिले आहेत. तेथे नियोजित तारखांनाच मतदान होणार आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

    Chief Electoral Office (CEO) West Bengal has called for an all-party meeting asking all political parties to adhere to cOVID19 guidelines mandated by the Election Commission of India (ECI) for strict compliance:

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही