• Download App
    पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?|Pune remains short of Remedesivir injections, backlog at 45,000; In the market after April 20?

    पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर ; 20 एप्रिलनंतर बाजारात ?

    वृत्तसंस्था

    पुणे : कोरोना बाधित रुग्णांवर प्रभावी असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पुण्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला आज झाला नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे.रेमडेसिवीरची निर्मिती करणाऱ्या प्रमुख सात कंपन्या आहेत.Pune remains short of Remedesivir injections, backlog at 45,000; In the market after April 20?

    त्यातील हेटरो लॅब लिमिटेडचा हैदराबादमधील प्लांट बंद आहे. त्यामुळे कंपनीकडून रेमडेसिवीरचा पुरवठाच बंद झाला.हेटरो कंपनी दररोज 35 हजार रेमडेसिवीरचे उत्पादन करते. उरलेल्या सहा कंपन्या 30 हजार इंजेक्शन्स तयार करतात.



    मात्र, दोन दिवसांपासून हेटरोचा हैदराबादमधील प्लांट बंद असल्याने रेमडेसिवीरचा पुरवठाच कंपनीने बंद केला आहे.दरम्यान, पुण्यातील आणीबाणीच्या परिस्थितीमुळे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी ज्या कंपनीचा सरकारबरोबर रेमडेसिवीर पुरवण्याचा करार आहे, त्या कंपनीकडून तीन हजार इंजेक्शन बुधवारी पुण्यासाठी मिळवली.

    पुण्याला रोज 15 ते 18 हजार रेमडेसिवीरची गरज

    पुण्याला दररोज 15 ते 18 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असून पुण्याचा रेमडेसिवीरचा बॅकलॉग 45 हजारांवर पोचला आहे. प्लांटमध्ये रेमडेसिवीर तयार करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिले 14 दिवस हे टेस्टिंगमध्ये जातात. त्यामुळं प्रत्यक्ष रुग्णापर्यंत ते पोचेपर्यंत वीस दिवस लागतात. त्यामुळं रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत कधी होणार याचं उत्तर प्रशासनाकडेही नाही.

    राज्यात रेमडिसवीर इंजेक्शनचा तुटवडा

    राज्यात रेमडिसवीर इंजेक्शनचा तुटवडा झाला आहे. 1 मार्च या दिवशी राज्यात 3 लाख व्हायल्स शिल्लक होत्या. त्या वेळी रोजची 15 हजार इंजेक्शनची गरज होती. त्यामुळे कंपन्यांनी नव्या बॅच टाकल्या नाहीत. आता नव्या बॅच टाकल्या गेल्यात. पण त्याचे उत्पादन प्रत्यक्षात बाजारात यायला 20 एप्रिल उजाडणार आहे.

    Pune remains short of Remedesivir injections, backlog at 45,000; In the market after April 20?

    Related posts

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!

    राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!