विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांत कॉँग्रेसचा सुफडासाफ होणारअसल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि गोव्याची सत्ता भाजपा राखणार आहे. पंजाबमध्ये कॉँग्रेसचा पराभव होणार असून आप सर्वात मोठा पक्ष बनणार आहे.BJP will retain power in Uttar Pradesh, AAP will rise in Punjab, Congress will be wipe out in all states
एबीपी न्यूजने सी व्होटरच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेमध्ये भाजप उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये आपली सत्ता कायम ठेवणार आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सपला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता असून सपाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल. सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच दिसत आहे.
चाळीस आमदार संख्या असलेल्या गोव्यात भाजपला 19 ते 30, आपला 5 ते 9, काँग्रेसला 4 ते 8, मगोप 2 ते 6 तर इतर पक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजपला 32 टक्के, आपला 22.5 टक्के, कॉंग्रेसला 19.8, मगोपला 7.7 टक्के आणि इतर पक्षांना 18.1 टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये प्काँग्रेसने जुन्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा बदलून चरणजितसिंह चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून सत्ताविरोधी लाट कमी करण्याचा प्रयत्न केला. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरली आहे. पंजाबमध्ये मुख्य लढत ही आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचं दिसून येतंय.
यामध्ये आप सत्तेत येण्याची शक्यता असून आपला 52 ते 58 जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला 37 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. अकाली दलाला 17 ते 23 आणि भाजपला केवळ 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आली आहे.
BJP will retain power in Uttar Pradesh, AAP will rise in Punjab, Congress will be wipe out in all states
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवा एकनाथ खडसे यांनी टीकेची पातळी सोडली
- शिवसेना-राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा पतंग काँग्रेसने गोव्यात शिरण्यापूर्वीच काटला
- WATCH : एटीएम सेंटरला भीषण आग कल्याणमध्ये घटना; काही सेकंदात सेंटर भस्मसात
- जयंत पाटलांना गोटखिंडी येथील चिमुकलीचा प्रेमळ सल्ला , म्हणली – साहेब…..