• Download App
    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार Big Update on West Bengal Panchayat Election As per the order of the State Election Commission  re polling will be held in some districts

    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार

    ६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी पुन्हा मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने रविवारी (९ जुलै) सांगितले की, पंचायत निवडणुकीसाठी पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण २४ परगणा येथे पुन्हा मतदान होणार आहे. Big Update on West Bengal Panchayat Election As per the order of the State Election Commission  re polling will be held in some districts

    बंगाल राज्य निवडणूक आयोगाने मतदान अवैध घोषित केलेल्या बूथवर सोमवारी (१० जुलै) पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे.

    पश्चिम बंगालमधील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. या दरम्यान झालेल्या हिंसाचारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.  अधिका-यांनी सांगितले की, ज्या जिल्ह्यांमध्ये पुनर्मतदान जाहीर झाले, त्यापैकी मुर्शिदाबादमध्ये सर्वाधिक १७५ बूथ आहेत, त्यानंतर मालदामध्ये ११२ बूथ आहेत. हिंसाचारग्रस्त नादियातील ८९ बूथवर फेरमतदान होणार आहे, तर उत्तर आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील ४६ आणि ३६ बूथवर फेरमतदान होणार आहे. एकूण ६०४ बूथवर मतदान होणार आहे.

    Big Update on West Bengal Panchayat Election As per the order of the State Election Commission  re polling will be held in some districts

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Putin told Trump : दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती निवडणुकीत लिबरल पक्षाचा विजय; ली जे-म्युंग होणार नवे राष्ट्रपती

    Mujibur Rahman : मुजीबुर रहमान आता बांगलादेशचे राष्ट्रपिता नाहीत; स्वातंत्र्यसैनिकाची व्याख्याही बदलली

    Kamal Haasan : तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व! कमल हसन यांचा कन्नड भाषेबाबत माफी मागण्यास ठाम नकार