प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षेविषयी जी हेळसांड झाली तो मुद्दा आता काँग्रेसने जातीवादावर आणला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या सर्व प्रकरणात दलित अँगल आणला आहे. पंतप्रधानांना पंजाब मध्ये दलित मुख्यमंत्री सहन होत नाही, असे ट्विट त्यांनी केले आहे काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील हे ट्विट करण्यात आले आहे.Bhupesh Baghel says, Prime Minister does not tolerate Dalit Chief Minister in Punjab !!
एकीकडे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान सर्व देशाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असे सांगून मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना फोन करून त्यांना काही सूचना केल्याच्या बातम्या आहेत. त्याच वेळी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे.
यामध्ये आता स्पेशल सिक्युरिटी ग्रुप अर्थात एसपीजी यांनाही घेरण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेची माहिती द्यायला हवी होती, अशा आशयाची अनेक ट्विट काँग्रेसने केली आहेत.
पण या सगळ्यांमध्ये वरकडी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी दलित जातीवादाचा अँगल आणला आहे. पंतप्रधानांना दलित मुख्यमंत्री सहन होत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसनेही याच आरोपाला दुजोरा दिला आहे.
Bhupesh Baghel says, Prime Minister does not tolerate Dalit Chief Minister in Punjab !!
महत्त्वाच्या बातम्या
- डोकं फिरलंया, नानाचं डोक फिरलंया, पंतप्रधानांता ताफा अडविण्यामागे अमित शहा यांचा हात असल्याची पटोलेंना शंका
- पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील चूक अक्षम्य, देशातील २७ माजी पोलीस महासंचालकांनी लिहिले राष्ट्रपतींना पत्र
- PUNJAB HIGH COURT : उच्च न्यायालयाला पंजाबची चिंता सरकारला पंतप्रधानांचा दौरा सांभाळता आला नाही-डेरा प्रमुखाला आणलं तर परिस्थिती कशी हाताळणार?
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : काँग्रेसची तिहेरी भूमिका; ट्विटरवर खिल्ली; पत्रकार परिषदेत “राजकारण नको”; सोनियांकडून २४ तासांनंतर दखल!!