विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचताच राहुल गांधींनी ट्विट करत राजा के सिंहासन तक आये है!!, असे म्हणत मिशांवर ताव दिला आहे आणि सायंकाळी त्यांचे लाल किल्ल्यावर भाषण होणार आहे. bharat jodo yatra rahul gandhi in delhi
इतके दिवस राहुल गांधी नफरत के माहोल में मोहब्बत की दुकान खोली है!!, असे म्हणत नम्रपणे जनतेचे ऐकून घेत होते. मूळात भारत जोडो यात्राही जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठीच काढली असल्याचे त्यांनी सुरुवातीला सांगितले होते. पण भारत जोडो यात्रा दिल्लीत पोहोचताच त्यांनी मिशांवर ताव दिला आहे आणि थेट दिल्लीच्या सिंहासनाला हादरवायला आलो आहोत, असा आव आणला आहे. सायंकाळी ते लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत.
या सगळ्या घटना क्रमाचा नेमका राजकीय अर्थ काय आहे??, याचा बारकाईने विचार केला, तर लाल किल्ला आणि नेहरू गांधी परिवार यांचे विशेष राजकीय नाते आहे. नेहरू गांधी परिवाराच्या चार पिढ्यांच्या पंतप्रधानांनी याच लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचे वर्षानुवर्षे भाषण केले आहे. आकड्याच्या हिशेबात बोलायचे झाले, तर 41 वर्षे नेहरू गांधी परिवारातील व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदावर होते. त्यामुळे 40 – 41 स्वातंत्र्य दिनाची भाषणे या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केली आहेत.
पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर गांधी परिवाराचे कोणीही पंतप्रधान पदावर बसलेले नाही. त्यामुळे नंतरच्या पिढीला लाल किल्ल्यावरून भाषण करता आलेले नाही. 2014 नंतर तर देशाची राजकीय संस्कृतीच काँग्रेस संस्कृतीकडून हिंदुत्ववादी संस्कृतीकडे वाळल्यानंतर गांधी परिवारापैकी कोणी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकेल ही शक्यताच धूसर झाली आहे.
मग अशावेळी लाल किल्ल्यावरून भाषणाची मूळ आपलीच परंपरा आहे अशी धारणा असलेल्या परिवाराने नेमके करायचे काय??, या प्रश्नाचे उत्तर परिवाराने आपल्या पद्धतीने शोधून प्रत्यक्ष कृती केली आहे. साधारण वर्षभरापूर्वीच शेतकरी आंदोलनाचा राडा लाल किल्ल्यावर झाला होता. तेथे शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानी झेंडे फडकविण्याची हिमाकत फुटीरतावाद्यांनी केली होती. त्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसच्या पाठिंबा होता. म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा झेंडा फडकविण्याचा सन्मान असलेल्या लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने फुटीरतावादी आंदोलनाचे सावट मुद्दामून टाकण्यात आले होते.
आता भारत जोडो यात्रा जेव्हा राजधानी दिल्लीत पोहोचली आहे, तेव्हा दिल्लीच्या सिंहासनाला हादरा देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सांगत राहुल गांधींनी मिशांवर ताव दिला आहे आणि ते सायंकाळी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत. यातली क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे. किंबहुना वर उल्लेख केलेल्या प्रश्नाचे उत्तरच या क्रोनोलॉजीत दडले आहे.
bharat jodo yatra rahul gandhi in delhi
महत्वाच्या बातम्या
- मोदी नव्हे, अदानी – अंबानींचे सरकार!; माँ बेटे की सरकारच्या टीकेला 8.5 वर्षांनी प्रत्युत्तर
- 81.35 कोटी जनतेला वर्षभर मोफत धान्य; मोदी सरकारचा मोठा निर्णय
- भगूरमध्ये सावरकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणी
- स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती