• Download App
    बेळगाव, हुबळी- धारवाड महापालिकेत भाजपची सत्ता , कलबुर्गी पालिकेमध्ये मात्र काँग्रेसचे वर्चस्व Belgaum, Hubli- BJP is in power in Dharwad Municipal Corporation

    बेळगाव, हुबळी- धारवाड महापालिकेत भाजपची सत्ता; कलबुर्गीमध्ये मात्र काँग्रेसला काठावरची सरशी

    वृत्तसंस्था

    बंगळूर : कर्नाटकातील बेळगाव, हुबळी- धारवाड महापालिकेत भाजपने सत्ता काबीज केली असून कलबुर्गी पालिकेत काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आहे. Belgaum, Hubli- BJP is in power in Dharwad Municipal Corporation

    बेळगाव महापालिकेत तब्बल ८ वर्षांनी निवडणुका झाल्या. २०१३ मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची सत्ता होती. त्यानंतर २०१४ मध्ये महापौर निवड झाली आणि कारभार सुरु झाला. त्यानंतर महापालिका बरखास्त झाली.

    यानंतर ३ सप्टेंबरला प्रथमच निवडणूक झाली. आज मतमोजणी होऊन भाजपने प्रथमच स्वबळावर सत्ता काबीज केली आहे. कर्नाटक निवडणूक आयोगाने तीन महापालिकेचा निकाल जाहीर केला. तो पुढील प्रमाणे आहे.

    बेळगावमधील निवडणुकीचा अंतिम निकाल

    • एकूण जागा: ५८
    • भाजप : ३५
    • काँग्रेस : १०
    • एआयएमआयएम : १
    • महाराष्ट्र एकीकरण समिती : ४
    • अपक्ष : ८

    हुबळी- धारवाड महापालिका अंतिम निकाल

    • एकूण जागा : ८२
    • भाजप : ३९
    • काँग्रेस : ३३
    • एआयएमआयएम : ३
    • जनता दल (एस) : १

    कलबुर्गी महापालिका अंतिम निकाल

    • एकूण जागा: ५५
    • काँगेस : २७
    • भाजप : २३
    • जनता दल (एस) : ४
    • अपक्ष : १

    Belgaum, Hubli- BJP is in power in Dharwad Municipal Corporation

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही