• Download App
    ममतांच्या पोटनिवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी नोंदविले कोलकत्याच्या मतदार यादीत नाव!! । Before Mamatas by-election, Prashant Kishor registered his name in the Kolkata voter list

    ममतांच्या पोटनिवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी नोंदविले कोलकत्याच्या मतदार यादीत नाव!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपले नाव कोलकत्याच्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महत्वाच्या भवानीपूर पोट निवडणुकीपूर्वी त्यांनी हे काम करून घेतले आहे. ते प्रशांत किशोर असे जरी नाव नुसते लावत असले तरी त्यांचे आडनाव पांडे आहे, असे त्यांच्या नोंदणी करून दिसून येते. Before Mamatas by-election, Prashant Kishor registered his name in the Kolkata voter list



    प्रशांत किशोर पांडे हे मूळचे बिहारमधल्या सासाराम जिल्ह्याचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची रणनीती ठरविण्याचे काम त्यांनी केले होते. त्यात त्यांना अभूतपूर्व यश आले. परंतु खुद्द ममता बॅनर्जी मात्र नंदिग्राम मधील निवडणूक हरल्या. त्यामुळे भवानीपूरच्या पोटनिवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.

    अशा स्थितीत भाजपने आपल्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल करू नये तसेच ममता बॅनर्जी यांना मदत व्हावी या हेतूने प्रशांत किशोर पांडे यांनी आपले नाव पश्चिम बंगालमधल्या मतदार यादीत नोंदवून घेतले आहे. यासाठी त्यांनी आपला “केअर ऑफ” पत्ता खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानाचा दिला आहे.

    Before Mamatas by-election, Prashant Kishor registered his name in the Kolkata voter list

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची