विशेष प्रतिनिधी
बीड: बीड जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनाक्रमात संतप्त माकडांच्या टोळीने तब्बल २५० कुत्र्यांची हत्या केली होती. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली .बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे ही घटना घडली.Beed: Special killing of 250 dogs at Majalgaon; Finally, two monkeys were caught by the Nagpur Forest Department
मागील महिन्यापासून ही संतप्त माकडांची टोळी बेभान होऊन कुत्र्यांना ठार मारण्याचं काम करत होती. कुत्र्यांच्या पिल्लांची हत्या करणाऱ्या दोन माकडांना नागपूर वनविभागाच्या पथकाने काल रात्री बीडमध्ये पकडले आहे.
दोन्ही माकडांना जवळच्या जंगलात सोडण्यासाठी नागपूरला हलवण्यात येत आहे.
कुत्र्यांना मारण्याची माकडांची खास पद्धत
संतप्त माकडांची ही टोळी खास पद्धतीने कुत्र्यांची हत्या करत आहे. ही सर्व माकडं कुत्र्याला एखाद्या इमारतीच्या किंवा झाडाच्या वरच्या टोकावर घेऊन जातात आणि तेथून या पकडलेल्या कुत्र्याला खाली टाकून देतात.
माकडांच्या या हाहाकारानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. एक दिवस वनविभागाचे कर्मचारी आलेही, मात्र त्यांना या माकडांच्या टोळीतील एकाही माकडाला पकडता आलं नाही. ते रिकाम्या हातीच मागे गेले.मात्र आता नागपूर वनविभागातील अधिकाऱ्यांनी दोन माकडांना पकडले आहे.
माकडांकडून कुत्र्यांच्या हत्येचं कारण काय?
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील काही कुत्र्यांनी एका माकडाच्या पिलाला मारलं. यानंतर संतप्त माकडांच्या टोळीने या परिसरातील कुत्र्यांची हत्या करण्यास सुरुवात केली.
ही माकडांची टोळी परिसरातील कुत्र्यांवर लक्ष ठेऊन त्यांना पकडून नेते आणि ठार मारते. हा प्रकार मागील महिनाभरापासून सुरू आहे. माकडांच्या हाहाकाराने या परिसरात कुत्रं दिसणं महाग झालं आहे. या काळात माकडांनी तब्बल २५० कुत्र्यांचा जीव घेतला.
Beed: Special killing of 250 dogs at Majalgaon; Finally, two monkeys were caught by the Nagpur Forest Department
महत्त्वाच्या बातम्या
- Surrogacy Bill : लोकसभेत संमत; नॅशनल सरोगसी बोर्ड आणि राज्य सरोगसी बोर्ड स्थापन;कमर्शियल सरोगसीला चाप
- दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा
- सातारा : पोवईनाक्यावर डांबराच्या ट्रकने अचानक घेतला पेट
- TET EXAM Paper leak : टीईटी पेपरफुटी प्रकरण – थेट जालना कनेक्शन! प्राध्यापकाची ऑडिओ क्लिप-पुणे क्राईम ब्रँच वाटूरात