• Download App
    औरंगाबादसाठी खुशखबर ! नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल;नितीन गडकरींचं वक्तव्यaurangabad Three-storied flyover in Aurangabad on the lines of Nagpur

    NITIN GADKARI : औरंगाबादसाठी खुशखबर ! नागपूरच्या धर्तीवर औरंगाबादेत तीन मजली उड्डाणपूल;नितीन गडकरींचं वक्तव्य

    • औरंगाबाद म्हणजे आशियातील वेगाने विकसित होणारे शहर .
    • स्मार्ट सिटीमुळे औरंगाबाद चांगलेच विकसित झाले आहे.
    • समृद्धी महामार्ग , धुळे सोलापूर महामार्ग यानंतर आता औरंगाबादमध्ये आगामी काळात बाबा पेट्रोलपंप ते वाळूजपर्यंत तीन मजली उड्डाण पूल होईल,

    विशेष प्रतिनिधी

    लातूरः औरंगाबादमध्ये नागपूरच्या धर्तीवर 20 किलोमीटर लांबीचा तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भारतातील रस्ते व पूल बांधणीत अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असून कमी खर्चात, कमी वेळेत दर्जेदार काम केले जाईल, अशी ग्वाहीदेखील नितीन गडकरी यांनी दिली.aurangabad Three-storied flyover in Aurangabad on the lines of Nagpur

    लातूर जिल्ह्यातील 19 महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उड्डाणपूलामुळे थेट पुणे, नगरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.


    Nitin Gadkari: मेरा वचन ही है शासन ! २०४८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण;नाशिक-मुंबई दोन तासांत; गडकरी म्हणतात टेप करून ठेवा…


    आपल्या भाषणातही त्यांनी या पुलाचे महत्त्व स्पष्ट केले. नव्या प्रकल्पामुळे औरंगाबादच्या चौकातून थेट वाळूजपर्यंत वाहनधारकांना जाणे सोयीचे होईल. परिणामी पुण्याला जाणे अधिक सोपे होईल.

    कसा असेल त्रिस्तरीय उड्डाणपूल?

    यावेळी नियोजित तीन मजली उड्डाणपुलाविषयी बोलताना बनसोडे म्हणाले, या प्रकल्पात पहिल्या मजल्यावर आठ पदरी लेन असेल तर दुसऱ्या मजल्यावर आणखी एक पूल असेल.

    तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो, इलेक्ट्रिकवर चालणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यरत करण्याची योजना आहे. मराठवाड्याला 20 हजार कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. रस्ते हे केवळ गावे जोडत नाहीत तर माणसांची मनेही जोडतात, असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.

    aurangabad Three-storied flyover in Aurangabad on the lines of Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही